शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा येथील घटना दुर्दैवी, मात्र एल्गार परिषदेमुळे नाही झाली दंगल - रामदास आठवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 17:12 IST

प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात घेतलेल्या एल्गार परिषदेमुळे कोरेगाव-भीमाची दंगल झालेली नाही. कोपर्डी येथील घटना, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर व वढू गावातील प्रकरणाचा परिपाक म्हणजेच कोरेगाव भीमा येथील घडलेली घटना आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले. 

औरंगाबाद : प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात घेतलेल्या एल्गार परिषदेमुळे कोरेगाव-भीमाची दंगल झालेली नाही. कोपर्डी येथील घटना, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर व वढू गावातील प्रकरणाचा परिपाक म्हणजेच कोरेगाव भीमा येथील घडलेली घटना आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिन समारंभास उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले हे रविवारी औरंगाबादेत आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, दलित-मराठा समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काही मराठा व हिंदुत्ववादी संघटनांचे मोठे षङ्यंत्र असून, या घटनेचे बोलविते धनी कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांना पोलिसांनी अटक करावी. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. या घटनेच्या दुसर्‍या दिवशी राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. माझाही पक्ष बंदमध्ये सहभागी होता. माझ्याही अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. 

पोलिसांनी धरपकड करून दलित कार्यकर्त्यांविरुद्ध काही ठिकाणी ३०७, तर काही ठिकाणी ३९५ कलमांन्वये दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत. दगडफेक करताना जे कार्यकर्ते फुटेजमध्ये दिसत असतील त्यांच्यावरच कारवाई करावी, याबद्दलही आपण मुख्यमंत्र्यांसोबत बोललो आहे. मराठा समाजाने मात्र अतिशय संयमाची भूमिका घेतली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दलित व मराठा समाजाने सोबत राहून गावगाडा हाकला पाहिजे. या दोन समाजात दरी निर्माण होणे, हे परवडणारे नाही. मराठा समाजाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो, अशी चुकीची भावना ठेवू नये. या कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मराठा समाजाच्या तरुणांनीही कोणाच्या भयकाव्यात येऊ नये. 

जिग्नेश यांनी आंबेडकरवादी बनावे

जिग्नेश मेवानी यांच्यासंदर्भात आठवले म्हणाले की, जिग्नेश यांनी अगोदर आंबेडकरवादी बनावे. खरा आंबेडकरवादी कार्यकर्ता ‘लाल सलाम’ कधीच म्हणत नाहीत. नक्षलवाद्यांच्या चळवळीबद्दल बोलताना ते म्हणाले, नक्षलवाद्यांचा मोठा त्याग आहे; पण त्यांच्या चळवळीत हिंसा आहे. ते आम्हाला मान्य नाही. ते आदिवासी समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात यावे लागेल. 

‘एक विचार-एक मंच’ तकलादूविद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांनी आंबेडकरी पक्ष-संघटनांच्या वेगवेगळ्या व्यासपीठाला विरोध केला आहे. एकाच व्यासपीठावर दलित नेत्यांनी यावे, असा त्यांचा आग्रह आहे. एक दिवस एका स्टेजवर येण्याने ऐक्य होणार आहे का, असा प्रश्न रामदास आठवले यांनी उपस्थित केला. ऐक्य तकलादू नसावे. यासाठी अगोदर ऐक्याचा फार्म्युला तयार करायला पाहिजे. समाजाने एकत्र यायला हवे. नेते फुटले तरी समाजाने फुटू नये. कार्यकर्ते एकत्र आले, तर नेत्यांनाही एकत्र यावेच लागेल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार