शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

लातूरच्या रस्ते बांधकामाच्या चौकशीपत्रालाही केराची टोपली

By admin | Updated: June 28, 2014 01:16 IST

दत्ता थोरे, लातूर लातूरच्या बाधंकाम विभागाने जिल्ह्यातील रस्त्याबांबत केलेल्या घोटाळ्याची दखल खुद्द औरंगाबादच्या प्रादेशिक बांधकाम अधीक्षक अभियंत्यांनीही घेतली होती.

दत्ता थोरे, लातूरलातूरच्या बाधंकाम विभागाने जिल्ह्यातील रस्त्याबांबत केलेल्या घोटाळ्याची दखल खुद्द औरंगाबादच्या प्रादेशिक बांधकाम अधीक्षक अभियंत्यांनीही घेतली होती. १८ मार्च २०१४ ला उस्मानाबादच्या अधीक्षक अभियंत्याना पत्र देऊन राजेंद्र शिंदे यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले होते. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. पण तिला गती नाही. कारण यासंबंधीच्या पत्राला लातूर विभागाने केराची टोपली दाखविली आहे. दुसरीकडे अ‍ॅड. संतोष गिल्डा यांनीही पाठविलेल्या कायदेशीर नोटीसीला महिना उलटूनही अद्याप उत्तर देण्यात आलेले नाही. लातूरच्या बांधकाम विभागाच्या कारनाम्याच्या तक्रारी सर्वदूर गेल्या आहेत. याबाबत राजेंद्र शिंदे यांनी औरंगाबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक कार्यालयात मुख्य अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली. यानंतर मुख्य अभियंत्यांनी पिठासीन अधिकाऱ्यांमार्फत उस्मानाबाद सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्याला १८ मार्च १०१४ रोजी पत्र पाठविले. या पत्रात राजेंद्र शिंदे यांच्या तक्रारीचा संदर्भ घेऊन १०१३/प्र. क्र. १८७/रस्ते-२ दि. २६/६/१३ चे उल्लंघन केल्याच्या व निवीदा मॅनेज करून शासनाचे नुकसान करण्याच्या प्रक्रियेची चौकशी करण्याचे सूतोवाच केले आहे. या प्रकरणातील साऱ्या प्रशासकीय मुद्यांची रितसर चौकशी करून अहवाल देण्याचेही सुचविले आहे. या घटनेला तिसरा महिना चालू आहे. परंतु चौकशीला कासवगती आहे. या कासवगतीचे कारणेही लातूर विभागातच दडली आहेत. प्रादेशिक अभियंत्यांनी उस्मानाबाद मंडळाच्या अधीक्षक अभियंत्याला पत्र पाठविल्यानंतर त्यांनी याबाबत खुलासा मागविला. परंतु त्याला लातूर कार्यालयाने कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तीन महिन्यांपासूनची चौैकशी अपूर्ण राहीली असल्याचे उस्मानाबाद मंडळ कार्यालयातील सूत्राने सांगितले. नोटिशीलाही ‘नो अ‍ॅन्सर’ ! या रस्त्याच्या कामाच्या चौकशीबाबत अ‍ॅड. संतोष गिल्डा यांनी लातूरच्या बांधकाम विभागाला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. परंतु या नोटीशीची कसलीच दखल बांधकाम अभियंत्यांनी घेतली नाही.