शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कराडांचा नगरसेवक ते महापौर प्रवास माझ्यामुळे; चंद्रकांत खैरेंचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 14:06 IST

Chandrakant Khaire Vs Bhagvat Karad : २ जून रोजी एन-४ मधील एका कार्यक्रमात खा.डॉ.कराड यांनी खैरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

ठळक मुद्देकराड म्हणाले, मला काही लोकसभा लढायची नाही

औरंगाबाद : भाजपचे खा.डॉ.भागवत कराड यांचा नगरसेवक ते महापौर हा राजकीय प्रवास माझ्यामुळे झाला आहे. त्यामुळे आधी त्यांनी त्यांचे पहावे, मग माझ्याकडे बोट दाखवावे. लोकांच्या कामांसाठी अधिकाऱ्यांना बोलावे लागते, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी शुक्रवारी खा. डॉ.कराड यांच्या वक्तव्याप्रकरणी दिले.

शिवसेनेचे माजी खा. खैरे हे महापालिकेत लुडबुड करतात. मी खासदार आहे, त्यामुळे कोणती कामे कशी करायची याची मला जाण असल्याचा टोला खा.डॉ. कराड यांनी २ जून रोजी लगावला होता. खा.डॉ.कराड यांच्या टीकेला माजी खा.खैरे यांनी शुक्रवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. या दोन्ही उभयंतांची राजाबाजार येथे संस्थान गणपती येथेही एका विधीनिमित्त भेट झाली. या भेटीत शिवसेना-भाजप युतीवरून दोघांमध्ये उत्तर-प्रत्युत्तरेही झाली.

२ जून रोजी एन-४ मधील एका कार्यक्रमात खा.डॉ.कराड यांनी खैरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. माजी खा.खैरे यांनी वैधानिक पद नसतानाही सरकारी बैठकांचे सत्र सुरू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची, त्यानंतर नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांची, सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक घेतल्याने प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येत आहे. त्यातच खा.कराड यांनी खैरे हे पालिकेत लुडबुड करीत असल्याची जाहीर टीका करून त्यांना डिवचले.

मी त्यांना जाब विचारलालोकांसाठी अधिकाऱ्यांना बोलावे लागते. खा.कराड यांना त्यांच्या वक्तव्याप्रकरणी आज मी जाब विचारला. युती केली पाहिजे, अशी इच्छा त्यांनीच माझ्याकडे व्यक्त केली, असे माजी खा.खैरे यांनी सांगितले.

त्यांनाच लोकसभा लढायचीमला काही खासदारकी लढायची नाही. त्यांना पुन्हा लोकसभा लढण्याची इच्छा आहे. तेच मला आज भेटले होते. त्यांनी शिवसेना-भाजप युती होत असल्याचे मला सांगितले. यातून कुणाला कुणाची गरज आहे, हे स्पष्ट होते.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना