शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरची कर दे धमाल; धावपटूंनी गाजवले मैदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 05:49 IST

‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद : प्राजक्ता, विवेक अव्वल 

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : वंदे मातरम्, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेच्या निनादात चैतन्यपूर्ण वातावरणात रविवारी झालेल्या २१ कि.मी. अंतराच्या लोकमत महामॅरेथॉन नागपूरची प्राजक्ता गोडबोले आणि कोल्हापूरचा विवेक मोरे यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष गटांत जिंकली. 

पहाटे पाच वाजून ५० मिनिटांनी महामॅरेथॉनला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. पूर्ण छत्रपती संभाजीनगरच महामॅरेथॉनमय झाले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे देशभरातूनच नव्हे तर परदेशातील धावपटूंचा सहभाग हे यंदाच्या महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले. महिला गटात पहिल्या दहा कि.मी.मध्ये सावध सुरुवात केल्यामुळे पिछाडीवर असलेल्या प्राजक्ताने दुसऱ्या फेरीत मात्र, आपला धावण्याचा वेग वाढवताना एक तास २० मिनिटे २५ सेकंदासह अव्वल स्थानावर कब्जा केला. प्राजक्ताप्रमाणेच कोल्हापूरचा विवेक मोरे हा पहिल्या दहा कि.मी. अंतरात मागे होता. मात्र, त्याने पुढील दहा कि.मी.मध्ये जोरदार मुसंडी मारली आणि पुरुष गटांत एक तास नऊ मिनिटे २४ सेकंद वेळ नोंदवताना अव्वल स्थान पटकावले. 

निओ व्हेटरन महिला गटात मुंबई महामॅरेथॉनमध्ये तब्येत बरी नसल्यामुळे दुसऱ्या स्थानावर समाधान मानाव्या लागणाऱ्या परभणीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्योती गवते हिने मात्र, छत्रपती संभाजीनगरात आपली कामगिरी उंचावली. तिने २१ कि.मी. अंतर एक तास ३३ मि. आठ सेकंदासह विजेतेपद पटकावले.  पुरुषांमध्ये रमेश गवळीने एक तास १२ मिनिटे वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. 

पुरुष व्हेटरन गटात ठाणे येथील कामगिरीचीच पुनरावृत्ती करताना भास्कर कांबळेने एक तास २० मिनिट व ३८ सेकंदासह पहिला क्रमांक पटकावला.  महिला गटात पल्लवी मूगने मुंबई महामॅरेथॉनपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर येथील लोकमत महामॅरेथॉन गाजवताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

प्राजक्ताची छत्रपती संभाजीनगरात हॅट्ट्रिकनागपूरची धावपटू प्राजक्ता गोडबोले हिला छत्रपती संभाजीनगर येथील लोकमत महामॅरेथॉन नेहमीच लकी ठरली आहे. तिने सलग तिसऱ्यांदा लोकमत महामॅरेथॉन जिंकली. लोकमत समूहाचे महामॅरेथॉनचे उत्कृष्ट नियोजन असते. छत्रपती संभाजीनगरात धावण्याचा अनुभव असल्याने त्याचा लाभ आपल्याला होतो, असे प्राजक्ता गोडबोलेने सांगितले.

महामॅरेथॉनमुळे निघतो डाएटचा खर्च    कोल्हापूरचा विवेक मोरे हा गतवर्षी छत्रपती संभाजीनगरातील महामॅरेथॉनमध्ये दुसरा होता. यंदा त्याने कामगिरी उंचावताना नंबर वनवर झेप घेतली. यावर्षी चांगला सराव असल्यामुळे आपण २१ कि.मी. अंतर सहज पार केल्याचे सांगितले. प्रतिस्पर्धी सुमेध सिंग सुरुवातीला पुढे होता, मात्र त्यानंतर आपण मुसंडी मारली.  लोकमत महामॅरेथॉनमुळे आपला डाएटचा खर्च निघतो, असे त्याने सांगितले.

आता रंगणार नाशिकला थरारठाणे येथील मुंबई महामॅरेथॉनपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी झालेल्या महामॅरेथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आता पुढील महामॅरेथॉनचा थरार नाशिक येथे ७ जानेवारी रोजी होणार आहे.

स्पर्धेतील पदक विजेते

 २१ किमी अर्धमॅरेथॉन खुला गट : पुरुष : १. विवेक मोरे, २. सुमित सिंग, ३. आकाश जयन. महिला : १. प्राजक्ता गोडबोले, २. आरती पावरा, ३. परिमला बाबर. निओ व्हेटरन गट (३६-४५ वर्षांपर्यंत)पुरुष : १. रमेश गवळी, २. राकेश यादव, ३. विवेक अय्यर.महिला : १. ज्योती गवते, २. रंजना  पवार, ३. गुंजन पाटील. व्हेटरन गट (४६ वर्षांवरील) पुरुष  : भास्कर कांबळे, २. आर. मोनी, ३. कृष्णा भद्रेवार. महिला :  १. डॉ. पल्लवी मूग, २. शीतल संघवी, ३. विठाबाई कच्छवे.  डिफेन्स : पुरुष : १. अविनाश पटेल, २. शैलेश गंगोडा, ३. शिवाजी हाके.महिला : १. प्रिती चौधरी, २.  प्रियांका पाइकराव, ३. पूजा पाडवी.  १० किमी मॅरेथॉनखुला गट : पुरुष : १. अश्विन, २. आसिफ खान,  ३. रोहित चव्हाण.महिला : १. निशा कुमारी, २. आकांक्षा शेलार, ३.अमृता गायकवाड. निओ व्हेटरन (३६-४५ वर्षांपर्यंत) :पुरुष : १. अक्षय कुमार, २. चंद्रवीर सिंग, ३. सुनील सोनवणे. महिला : १. शारदा काळे, २. मिनाज नदाफ, ३. पूनम सूर्यवंशी व्हेटरन (४६ वर्षांवरील)१. अश्विनी आचार्य, २. समीर कोलया, ३. सतीश यादव. महिला : १. डॉ. इंदू टंडन, २, परिणीता खैरनार, ३. सीमा वट्टमवार.