लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार या चित्रपटाच्या विरोधात काँग्रेसने शहरातील तीन सिनेमागृहांबाहेर जोरदार निदर्शने करीत ‘शो’ बंद पाडले़ तसेच भांडारकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़इंदू सरकार या चित्रपटाला सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला आहे़ तसेच या चित्रपटाचे शो होऊ देणार नाही असा इशाराही दिला होता़ शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता़सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील चित्रपटगृहांबाहेर अनेकांनी गर्दीही केली होती़ त्याचवेळी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सिनेमागृहाबाहेर निदर्शने करण्यास सुरुवात केली़ शहरातील पीव्हीआर, ज्योती टॉकीज आणि भारत इस्क्वेअर या तीन चित्रपटगृहांबाहेर काँग्रेसने निदर्शने करीत मधुर भांडारकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली़त्यामुळे चित्रपटगृह चालकांनीही या चित्रपटाचे शो बंद करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार या चित्रपटाचा पहिला शो सकाळी बंदच होता़ तर इतर ‘शो’ ही बंद करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला़ त्यामुळे या चारही चित्रपटगृहांबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, उमेश पवळे, किशोर स्वामी, उदय देशमुख, विलास धबाले, विठ्ठल पावडे, गोपी मुदिराज, संदीप सोनकांबळे, रुपेश यादव, नागनाथ गड्डम, उमेश चव्हाण, दुष्यंत सोनाळे, राहुल देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़
काँग्रेसची सिनेमागृहाबाहेर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:32 IST