शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रावसाहेब दानवेंच्या रेल्वे राज्यमंत्रीपदामुळे मराठवाड्याला न्यायाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 13:06 IST

Raosaheb Danve News : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून मराठवाड्याला आशेचा किरण

ठळक मुद्देमराठवाड्यातील रेल्वे प्रश्न येणार ‘फास्ट ट्रॅक’वर वर्षानुवर्षे रेंगाळलेले रेल्वे प्रश्न सुटण्याची अपेक्षा

औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाले आणि वर्षानुवर्षे रेल्वे प्रश्नांसाठी झगडणाऱ्या अवघ्या मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. मराठवाड्याला रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाल्याने वर्षानुवर्षे रेंगाळलेले रेल्वे प्रश्न आता ‘फास्ट ट्रॅक’वर येतील आणि मराठवाड्यात रेल्वेचा विकास होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. ( Justice for Marathwada is expected due to Raosaheb Danve's post of Minister of State for Railways) 

मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यातही बहुतांश एकेरी मार्गच. परिणामी, रेल्वेगाड्यांची संख्याही कमी आहे. नवीन रेल्वे मार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेतच वर्षानुवर्षे निघून गेली. आगामी ३० ते ४० वर्षांच्या दृष्टीने तयार केलेल्या नव्या राष्ट्रीय रेल्वे योजनेतही मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली. लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत आणि रेल्वे प्रश्नांसाठी होणारी संघटनांची आंदोलनेही बंद झाली आहेत. त्यामुळे मराठवाड्यात रेल्वेचा विकास कसा होईल, असा सवाल जनतेतून उपस्थित करण्यात येतो.

मराठवाड्यात रेल्वे प्रश्न, मागण्या आणि प्रस्ताव वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. रेल्वेच्या मागण्यांना रेल्वे बोर्डाकडून एकतर केराची टोपली दाखविली जाते. अन्यथा तुटपुंज्या निधीवर बोळवण केली जाते. परिणामी, मागण्यांच्या जंजाळातच रेल्वे अडकली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वेची अवस्था वर्षानुवर्षे ‘जैसे थे’च आहे. परंतु आता मराठवाड्यातील रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास मराठवाड्याला मिळालेल्या रेल्वे राज्यमंत्री पदामुळे व्यक्त होत आहे.

दुहेरीकरणाला मिळेल ‘ग्रीन सिग्नल’मुदखेड ते परभणी या ८१ कि. मी. मार्गाचे दुहेरीकरण मार्गी लागले. यामुळे परभणी-औरंगाबाद-मनमाड २९१ कि.मी. मार्गाचेही दुहेरीकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. दक्षिण मध्य रेल्वेनेही या मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला; मात्र रेल्वे बोर्डाकडून अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे एकेरी मार्गावरूनच रेल्वे धावत आहे. परंतु रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामुळे विद्युतीकरणापाठोपाठ आता दुहेरीकरणाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रलंबित रेल्वे प्रश्न, मागण्या पूर्ण होण्याची आशा :१) रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्ग.२)औरंगाबाद-दौलताबाद-चाळीसगाव मार्ग.३) सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-गेवराई व्हाया पैठण-औरंगाबाद-जळगाव मार्ग.४) जालना-खामगाव रेल्वे मार्ग.५)औरंगाबाद- नगर-पुणे मार्ग.६)औरंगाबादेत पीटलाईन.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वेMarathwadaमराठवाडा