शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चक्क सहा दिवसांनी कळला कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाला तपासणी अहवाल; बाधिताला भेटलेल्यांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 11:56 IST

corona positive : सहा दिवस सुटीच्या काळात ते ग्रहस्थ मित्र परिवारासह नातेवाईकांना भेटले त्यांना तर संक्रमण झाले नसेल ना अशी चिंता त्यांना सतावू लागली

ठळक मुद्देदशमेशनगर परिसरातील एक कंपनीत काम करणारे ग्रहस्थ रेल्वेस्टेशन रोड येथे २१ जानेवारीला कोरोनाच्या तपासणीसाठी गेले.आरोग्य केंद्रावर त्यांचे नाव तपासल्यावर ते पाॅझीटीव्ह असल्याचे सांगण्यात आले

औरंगाबाद : महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना तपासणी केल्यावर अहवालच न कळवल्याने एक बाधित व्यक्ती सहा दिवस फिरत राहिली. कंपनीत रुजूृ व्हायचं म्हणून व्यक्ती तपासणी केंद्रावर अहवाल घ्यायला गेली तेव्हा तुमचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून तुम्ही भरती व्हा, असे त्या ग्रहस्थाला सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. दरम्यानच्या काळात सहा दिवस सुटीच्या काळात ते ग्रहस्थ मित्र परिवारासह नातेवाईकांना भेटले त्यांना तर संक्रमण झाले नसेल ना अशी चिंता त्यांना सतावू लागली, तर संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले असून संक्रमित तर झालो नसेल ना असा प्रश्न त्यांना सतावत आहे.

दशमेशनगर परिसरातील एक कंपनीत काम करणारे ग्रहस्थ रेल्वेस्टेशन रोड येथे २१ जानेवारीला कोरोनाच्या तपासणीसाठी गेले. अग्निशमन दल येथील तपासणी केंद्रात संध्याकाळी सातच्या सुमारात त्यांनी आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅब दिला. त्यावेळी त्या केंद्रावरील आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी सांगितले. पाॅझिटीव्ह असेल तर नक्की फोन येईल. मात्र, निगेटीव्ह असल्यास फोन शक्यतो येणार नाही. दुसर्या दिवशी ते दिवसभर घरी अलगीकरणात राहीले. मात्र, अहवाल आला नाही. किंवा मनपाकडून कुठलाही निरोप न मिळाल्याने ते बिनधास्थ झाले. दरम्यान ते मित्र, नातेवाईक कुटुंबियांच्या संपर्कात आले. बुधवारी सकाळी त्यांना खोकला यायला लागला. त्यामुळे लक्षणे दिसु लागल्याने त्यांनी तपासणी केली असल्याने रिपोर्ट घेवून डाॅक्टरांकडे जाण्यासाठी घरुन निघाले. मात्र, आरोग्य केंद्रावर त्यांचे नाव तपासल्यावर ते पाॅझीटीव्ह असल्याचे सांगून त्यांना अग्निशमन दलाच्या काॅरंटाईन सेंटर मध्ये भरती केल्या गेले. असे त्या बाधित रुग्णाने सांगितले. तांत्रिक अडचणीत किंवा मनपाचे कर्मचारी अहवाल सांगण्याचे विसरुन गेले असतील. त्यामुळे काही हरकत नसुन इथे आवश्यक सोयीसुविधा असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. मात्र, अगोदर रिपोर्ट कळाला असता तर इतरांच्या संपर्कात जाणे टाळता आले असते असे ते म्हणाले. 

बाधिताच्या संपर्कातील चिंतेततपासणी केल्याच्या दुसर्या दिवसापासून म्हणजे २३ ते २६ जानेवारी दरम्यान शासकीय दोन सुट्या मिळाल्या होत्या. त्यात कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ज्यांच्या संपर्कात ते बाधित आले. त्यांनी मात्र, कोरोनाचे संक्रमण झाले तर ना या बद्दल भिती व्यक्त केली. सध्या एकीककडे साथ आटोक्यात येत असतांना असे प्रसंग पुन्हा घडू नये यासाठी काळजी घ्यावी व काहीशी ढिली पडलेल्या यंत्रणेला पुन्हा सतर्क करुन गांभिर्य पटवून देण्याची मागणी त्या नातेवाईकांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद