शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

जूनअखेर होणार महामार्ग चौपदरीकरणाचा श्रीगणेशा

By admin | Updated: June 21, 2014 00:53 IST

देविसिंग राजपूत, येणेगूर दोन वर्षापासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ च्या चौपदरीकरणाच्या कामास प्रत्यक्ष २० ते २५ जून दरम्यान सुरुवात होणार असल्याची माहिती विभागीय प्रकल्प संचालक बी. बी. इखे,

देविसिंग राजपूत, येणेगूरदोन वर्षापासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ च्या चौपदरीकरणाच्या कामास प्रत्यक्ष २० ते २५ जून दरम्यान सुरुवात होणार असल्याची माहिती विभागीय प्रकल्प संचालक बी. बी. इखे, तांत्रिक सल्लागार आर. एम. जिरंगे व कोस्टलश्रेयीचे निवासी अभियंता आर. महापात्रा यांनी दिली. सोलापूर ते कर्नाटक सिमेपर्यंत शंभर किमी अंतरातील चौपदरीकरणाची निविदा हैदराबाद येथील कोस्टल श्रेयी कंपनीने २१ फेब्रुवारी २०१२ रोजी निविदाद्वारे ९२३ कोटी ४ लाखास घेतली होती. तर अनामत रक्कम २७ कोटी ९० लाख नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या खात्यात दोन वर्षापूर्वीच जमा केली होती. चौपदरीकरणात सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा, व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आली आहेत. फक्त नळदुर्ग बायपास वगळता अन्य सर्व गावाच्या शेतजमिनीचा मावेजा वाटप करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अवॉर्ड जाहीर करण्यासाठी उस्मानाबादच्या उपजिल्हाधिकारी मांजरा प्रकल्पाकडून करण्यात आले. प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतर ९१० किमी लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण होत असले तरी सध्या सहा पदरीकरणाच्यादृष्टीने भूसंपादन झाले आहे. हा महामार्ग पूर्णपणे कोस्टल श्रेयी स्वखर्चाने करीत असल्याने हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर या महामार्गावर दोन टोलनाके बसणार असून, त्याची टोल वसुली तब्बल २५ वर्षापर्यंत चालू राहणार आहे. तसेच येणेगूर येथे सुरू असलेला टोलनाका बंद करण्यात येणार आहे. रस्ता चौपदरीकरणानंतर ताशी १०० किमी अथवा त्याही पेक्षा अधिक वेगाने या मार्गावरून वाहने धावणार असल्याने सोलापूर ते हैदराबाद हे अंतर अवघ्या साडेचार तासात कापणे शक्य होणार आहे. या महामार्गाला छेदणाऱ्या राज्यमार्गावर (उमरगा चौरस्ता, आष्टामोड, तांदूळवाडी, नळदुर्ग-तुळजापूर रस्ता) या ठिकाणी मोठी फ्लायओव्हर ब्रीज तर छोट्या गावाचे रस्ते जोडणाऱ्या ठिकाणी मिनी फ्लायओव्हर ब्रीज बांधण्यात येणार आहेत. अशा प्रकारची सहा उड्डाणपुल व येणेगूर व दाळींब येथे दोन छोटे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. या महामार्गावर ८ मोठे व ३६ छोटे जक्शंन असून, प्रवाशांना गावाजवळ २४ प्रवाशी निवारे बांधण्यात येणार आहेत. ट्रकचालकांना दोन ठिकाणी विश्रांतीस्थान देण्यात येत असून, प्रत्येक गावानजीकचा सर्व्हीस रोड हा ७ मीटरचा प्रशस्त असणार आहे. चोवीस तास रुग्णवाहिका, पेट्रोलिंग व्हॅन, वाहनचालकांसाठी रेस्टझोन एरियात प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. महामार्गासाठी संपादित केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा वाटप करण्यात आला असून, इतर गावातील शेतकऱ्यांच्या मावेजा वाटपाचे काम प्रगतीपथावर आहे.विस्तारीकरणात अनेक गावातील घरे पाडण्यात येणार असले तरी त्या-त्या घरमालकांना योग्य मावेजा वाटप होणार आहे. विशेष म्हणजे बांधकाम काळात धूळ निर्माण होणे, वायू उत्सर्जन, खणन, खनीकर्म संयंत्रांमुळे होणारे प्रदूषण तसेच जमिनीच्या मृदेमधील होणारे संमिश्र दूषित पाण्यामुळे स्थानिक व कामगारावर होणारे आरोग्यविषयक दुष्परिणाम आदी बाबींवर प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी हा प्रकल्प सृदृढरीत्या निर्माण करण्यासाठी अगोदरच पर्यावरण विषयक लोकसुनावणी करण्यात आली आहे. जेवढी झाडे कापण्यात आली आहेत. त्याच्या तिपट्टीने महामार्गावर व दुभाजकांमध्ये फुलांच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. बांधकाम काळात स्टोनक्रशर, हॉटमिक्स प्लॅन्ट, बँच प्लॅन्ट उभारणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र ही बंधनकारक करण्यात आले आहे. नळदुर्ग व उमरगा या दोन शहरांना बायपास रस्ता देण्यात आला आहे. नळदुर्गसाठी खंडोबा पणन संस्थेपासून ते उत्तर बाजुने मुर्टा पाटीपर्यत साडेसहा किमीचा बायपास काढण्यात येणार आहे. उमरगा शहरासाठी बाबा पेट्रोलपंपापासून उत्तर बाजुने भागीरथी ढाब्यानजीक सहा किमीचा बायपास काढण्यात येणार आहे. महामार्गाच्या बांधकाम काळात नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सोलापूर ते संगारेड्डी गावादरम्यानची १२ हजार ६५२ कुटुंबे विस्थापित होत असून, महाराष्ट्रातील ४३१२ तर कर्नाटकातील ३८७५ व आंध्र प्रदेशातील ४४२५ लोकांच्या जमिनी व घरे अधिगृहित करण्यात आली आहेत. या प्रकल्पाअंतर्गत ६० हजार ५७५ वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. या महामार्गालगत प्राचीन धार्मिक व पर्यटन स्थळे दोन असून त्यापैदकी नळदुर्गचा पुरातन किल्ला व उमरग्याचे हेमाडपंथी महादेवमंदिर आहे. या पुरातन स्थळांना बाधा पोहोचणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. स्थानिक वाहतूक पादचारी व गुरांच्या येण्या-जाण्यामुळे अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी खालून जाणारे गाडी रस्ते, पादचारी व गायवाटा बांधून देण्यात येणार आहेत. अपघाताचे धोके लक्षात घेऊन हा प्रकल्प आय. आर. सी. संहितेनुसार असून, शास्त्रीय रचना असलेले बसथांबे, वाहतूक नियंत्रक, झेब्रा क्रॉसींग, जक्शन सुधारणा, दिवाबत्ती, माहितीपर फलकांची जागोजागी आवश्यकतेनुसार उभारणी करण्यात येणार आहे. नवीन रस्त्याच्या मधोमध पाच मीटर रुंद दुभाजक असून त्याचे कठडे उंच घेण्यात येणार आहेत. त्यामुळे बाजूच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाचा झोत चालकाच्या डोळ्यावर येणार नसल्याची दक्षता घेतली जाणार आहे. दुभाजकाच्या अंतरात काळी माती टाकून त्यात फुलझाडे लावण्यात येणार आहेत. प्रत्येक गावानजीक सर्व्हिस रोड दिला जाणार असून, त्याची लांबी ४७ किमी राहणार आहे. सदरील महामार्गावर ५ मोठे पूल तर २८ छोटे पुलांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ वरील सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी पुलाचे काम गुत्तेदारामार्फत हाती घेण्यात आले असून, यासाठी सदर महामार्गावरील वाहतूक शनिवार व रविवार असे दोन दिवस अन्य मार्गाने वळविण्यात येत असल्याचे अभियंता राजू जिरंगे यांनी सांगितले. तांदूळवाडी गावानजीक पूल कमकुवत होऊन धोकादायक बनला होता. दरम्यान, काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी हैैदराबादकडून जाताना ईटकळ, काटगाव, वडजी, बोरामणी मार्गे सोलापूर व परतीसाठीही हाच मार्ग वापरावा, असे आवाहन प्रकल्प संचालक बी. बी. ईखे व अभियंता राजू जिरंगे यांनी केले आहे.विशेष बाबी...सोलापूर ते हैदराबाद हे अंतर अवघ्या साडेचार तासात कापणे शक्य महामार्गावर दोन टोलनाके बसणार असून, त्याची टोल वसुली तब्बल २५ वर्षापर्यंत चालू राहणार आहे. दुभाजकाच्या अंतरात काळी माती टाकून त्यात फुलझाडे लावण्यात येणार आहेत. सहा उड्डाणपुल व येणेगूर व दाळींब येथे दोन छोटे उड्डाणपूल उभारणार.महामार्गावर ८ मोठे व ३६ छोटे जक्शंन असून, प्रवाशांना गावाजवळ २४ प्रवासी निवारे बांधण्यात येणार आहेत.चोवीस तास रुग्णवाहिका, पेट्रोलिंग व्हॅन, वाहनचालकांसाठी रेस्टझोन एरियात प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय.