शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'रिपब्लिकन'चे नवे समीकरण; जोगेंद्र कवाडे यांच्याकडून एकनाथ शिंदे गटासोबत युतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 12:30 IST

आता जी ताजी राजकीय उलथापालथ झाली, त्याचे आम्ही स्वागत करतो. सत्तेचे वारंवार परिवर्तन होत राहिले पाहिजे.

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांची युती होण्याचे संकेत मंगळवारी येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे पत्रपरिषदेद्वारे दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आमची सतत उपेक्षाच केली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सुभेदारी गेस्ट हाऊसवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कमिटीची बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, आता जी ताजी राजकीय उलथापालथ झाली, त्याचे आम्ही स्वागत करतो. सत्तेचे वारंवार परिवर्तन होत राहिले पाहिजे. आता गतिमान विकासाची अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त केले आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करेन, असे ते म्हणाले आहेत. त्यांची ही भूमिका आम्हाला आवडली आहे. परंतु हिंदू, हिंदुत्व हा घोळ आम्हाला कळत नाही. हिंदू धर्म आहे, पण ‘हिंदुत्व- हिंदुत्व’ केल्याने अन्य धर्मीयांच्या मनात भीती निर्माण होते, त्याचे काय ? हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवाद हे लक्षात घेतले पाहिजे. धर्माचा बाऊ न करता विकासाचा अजेंडा राबवला पाहिजे. संविधानाची मर्यादा ओलांडता कामा नये, अशी अपेक्षा यावेळी प्रा. कवाडे यांनी व्यक्त केली.

कवाडे यांनी केलेल्या मागण्या :एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळाली नाही. ती तत्काळ मिळावी,नवीन शहरे निर्माण करून संभाजीराजे व थोर पुरुषांची नावे देण्यात यावीत, दादर रेल्वेस्थानकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, पुणे शहराला म. फुलेनगर हे नाव द्यावे, नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे, दलित अत्याचारात ४० टक्के वाढ झाली आहे, त्याविरुद्ध कठोर पाऊले उचलावीत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीची प्रभाग पद्धती रद्द करण्यात यावी, ‘डॉ. बामू’ला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा.पत्रपरिषदेस महाराष्ट्राचे प्रभारी गोपाळराव आटोटे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, महासचिव ॲड. जे. के. नारायणे, मराठवाडा अध्यक्ष गणेशराव पडघन, चरणदास इंगोले, बापूराव गजभारे, राजाभाऊ इंगळे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रत्ना मोहोड, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJogendra kawadeजोगेंद्र कवाडेEknath Shindeएकनाथ शिंदे