औरंगाबाद : सक्षम एमपीएससी- युपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
यानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रा. पुरुषोत्तम शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. अजय चव्हाण, प्रा. कृष्णा जाधव, प्रा. अंकित चनखोरे पाटील, प्रा. मयूर सोनवणे या मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी एमपीएससी, युपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या आशा प्रधान, शीतल चव्हाण, प्रतीक्षा कांबळे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षेत कमीत कमी वेळेत कसे यश मिळवायचे याची माहिती संचालक प्रा. कृष्णा जाधव यांनी दिली. प्रा. चव्हाण यांनी स्वामी विवेकानंद व आजचा युवक याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुनंदा दारवटे व जयश्री पवार यांनी केले.