शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

झनझन यांनी घातला वय घटविण्याचा ‘घाट’

By admin | Updated: June 8, 2014 01:13 IST

औरंगाबाद : शासकीय सेवेत नोकरी लागल्यानंतर जन्मतारखेत काही चूक असल्यास प्रारंभीच्या पाच वर्षांतच बदल करण्याची मुभा आहे.

औरंगाबाद : शासकीय सेवेत नोकरी लागल्यानंतर जन्मतारखेत काही चूक असल्यास प्रारंभीच्या पाच वर्षांतच बदल करण्याची मुभा आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले महापालिकेतील अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांना आपले वय जास्त असल्याचा ‘दृष्टांत’ झाला. लगेचच त्यांनी प्रशासनाला अर्ज दिला. प्रशासनानेही त्यांचे वय तब्बल पाच वर्षे कमी करण्याच्या दृष्टीने ‘धोरण’ लावले आहे. झनझन यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी निवृत्तीला आले असून, त्यांना मनपाने वय कमी करून देण्याचे धोरण स्वीकारले नाही.अग्निशमन अधिकारी झनझन मनपात १९८७ मध्ये रुजू झाले. तेव्हापासून २०१३ पर्यंत त्यांना आपल्या सेवापुस्तिकेत चुकीची जन्मतारीख नोंदवल्याचा दृष्टांत झाला नाही. २०१३ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची बदली होणार असे लक्षात येताच झनझन यांना आपले वय जास्त असल्याचे वाटू लागले. त्यांनी लगेच एक अर्ज भापकर यांच्याकडे दिला. १३ आॅगस्ट २०१३ रोजी झनझन यांनी आपल्या अर्जावर भापकर यांच्याकडून सोयीचा शेरा लिहून घेतला. हा अर्ज त्यांनी प्रशासनाला सादर न करता खिशातच ठेवला. अलीकडे आयुक्तपदाचा पदभार गोकुळ मवारे यांच्याकडे होता. झनझन यांनी मागील अर्जाचा संदर्भ देत मवारे यांच्याकडून एक फाईल चालवली. त्यात वय कमी करून देण्याचा उल्लेख होता.या फाईलवर अनेक अधिकाऱ्यांनी वय कमी करून देता येत नाही, हे नियमबाह्य आहे, कोणत्याही अधिकाऱ्याला निवृत्तीच्या उंबरठ्यावर मेडिकल बोर्डाकडे तपासणीसाठी पाठवता येत नाही, असे निगेटिव्ह ताशेरे ओढले आहेत. या सर्व ताशेऱ्यांची पर्वा न करता मनपातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झनझन यांना मेडिकल बोर्डाकडे पाठविले. बोर्डानेही अनपेक्षितपणे त्यांचे वय चक्क ४ वर्षे कमी करून दिले. मेडिकल बोर्डाच्या अहवालावर त्यांची फाईल मनपात या टेबलवरून त्या टेबलवर अत्यंत दिमाखाने उड्या मारत आहे. यासाठी काही विधिज्ञांचा सल्लाही घेण्यात येत आहे. मनपाच्या दप्तरी आज झनझन यांची जन्मतारीख ३ जून १९५९ आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील साखरे बोरगाव येथील ग्रामपंचायतीकडून एक प्रमाणपत्रही मिळविले. त्यात जन्मतारीख ५९ नसून २२ जून १९६३ असल्याचे म्हटले आहे. असे प्रमाणपत्र कोर्टात एक शपथपत्र दिल्यास नगर परिषद, ग्रामपंचायतीकडून आपोआप मिळते. झनझन यांनी ज्या पद्धतीने आपले वय कमी करून घेण्यासाठी प्रशासनाला वेठीस धरले आहे, त्या आधारावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे पालिकेचे लक्ष लागले आहे. कारण झनझन यांना वय कमी करून दिल्यास इतर अनेक अधिकारी व कर्मचारी न्यायालयात धाव घेतील. दरम्यान, या प्रकाराबाबत आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. नियमाच्या विरुद्ध काममहाराष्ट्र नागरी सेवा सुधारणा नियम २००८ नुसार सेवेत दाखल झाल्यानंतर पाच वर्षांपर्यंतच जन्मतारखेत बदल करता येऊ शकतो. त्यासाठीही शासनाने त्याचे निकष, नियमावली ठरवून दिलेली आहे. झनझन यांचे वय कमी करून देण्याची प्रक्रिया म्हणजे शासनाच्या नियमाच्या अत्यंत विरुद्ध आहे.खोटारडेपणा उघड तरीहीझनझन यांनी १३ आॅगस्ट २०१३ रोजी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, आपण २४ सप्टेंबर १९८७ पासून आजपर्यंत २१ अर्ज दिले आहेत. त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. प्रत्येक अर्जाची तारीख त्यांनी नमूद केली आहे. या तारखांचा बारकाईने अभ्यास केल्यास सुटीच्या दिवशीही त्यांनी मनपाला अर्ज दिल्याचे म्हटले आहे. या सर्व तारखा खोट्या आणि त्यांनी अर्ज दिल्याचे नाट्यही खोटे असल्याचे दिसून येते. प्रशासनाला दिलेल्या २१ अर्जांची दुसरी प्रतही झनझन यांच्याकडे नाही. मनपाच्या कोणत्याच विभागात झनझन यांचे जुने अर्ज नाहीत, हे विशेष.