शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 5:59 PM

मे महिन्यापासून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता धूसर

औरंगाबाद : जेट एअरवेजची मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा कधी पूर्ववत होते, याकडे अवघ्या शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. मात्र, या विमानाची मे महिन्यासह पुढील बुकिंग सध्या ठप्प आहे. त्यामुळे ही विमानसेवा मे महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे. शिवाय विमानसेवा कायमस्वरूपी ठप्प होण्याचीही भीती व्यक्त होत आहे.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी येणारे जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान प्रारंभी ३१ मार्चपर्यंत रद्द केले. त्यानंतर २३ मार्चपासून सकाळचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानही रद्द करण्यात आले. सकाळच्या वेळेतील मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानाचे ३१ मार्चपासून पुन्हा उड्डाण सुरू होणार होते; परंतु या विमानाचे उड्डाण लांबणीवर पडले. ही विमानसेवा पुन्हा कधी सुरू होते, याकडे नुसते डोळे लावून बसण्याची वेळ येत आहे, तर दुसरीकडे जेट एअरवेजवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. विमान प्रवासासाठी अनेक दिवसांपूर्वी बुकिंग करण्याची सुविधा असते. आजघडीला जेट एअरवेजच्या मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानाची पुढील काही महिन्यांची बुकिंग बंद आहे. याविषयी जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

बुकिंग बंदप्रवाशांकडून विचारणा होत आहे; परंतु जेट एअरवेजची पुढील महिन्यातील बुकिंगच होत नाही. त्यामुळे सध्या व्यवसायावरदेखील परिणाम होत आहे, असे टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक आसिफ खान म्हणाले.

फ्लाईट दिसतच नाहीसध्या जेट एअरवेजच्या मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानाची पुढील महिन्यांतील बुकिंग बंद आहे. आमच्या पोर्टलवर फ्लाईट दिसतच नाही. त्यामुळे नागरिक पुढील नियोजनदेखील करीत नाही. एअर इंडिया, रेल्वेला प्राधान्य देण्याचे प्रमाण वाढले आहे, असे ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन आॅफ औरंगाबादचे अध्यक्ष आशुतोष बडवे म्हणाले.

...तर विमान सुरू होईलजेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान कधीपासून सुरू होईल, याची काहीही माहिती मिळत नाही. त्याची बुकिंगदेखील बंद आहे. त्यांचे आर्थिक संकट दूर झाले तर मेपासून विमानसेवा सुरू होऊ शकते, असे औरंगाबाद टुरिझम प्रमोटर्स गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग म्हणाले.

काहीही कळविले नाहीऔरंगाबाद-मुंबई-औरंगाबाद विमान कधीपर्यंत सुरू होईल, याविषयी जेट एअरवेजकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी सांगितले.

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेजAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन