गुंजोटी : उमरगा तालुक्यातील गुंजोटी रोडवर भरधाव वेगातील जीप पलटी होवून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर चौघे जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरगा येथून अमोल अशोक देशमुख (वय-२५) यांच्यासह पाच जण बुधवारी सकाळी खरेदीसाठी जीपमधून (एमएच.२४-व्ही.१६३८) उमरगा येथे गेले होते. खरेदी उरकल्यानंतर ही सर्व मंडळी गुंजोटीकडे परतत होते. सदरील जीप सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गावानजीक आली असता चालकचा ताबा सुटून जीप पलटी झाली. भरधाव वेगात असल्यामुळे जीपने एक -दोन नव्हे, तर तब्बल चार पलट्या खाल्ल्या. या अपघातात अमोल देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर रोहित देशमुख (वय-२८), बालाजी रेड्डी (वय-२९), विशाल देशमुख (वय-२५), भीमाशंकर शिलवंत (वय-२९) हे चौघेजण जखमी झाले आहेत. या सर्वांवर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहीच्या डोक्याला, काहींच्या हाताला, पायाला जबर मार लागला आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)
जीप पलटी होऊन एक ठार
By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST