शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'जायकवाडी'तून माजलगाव धरणात पाणी सोडले; बीड,माजलगावसाठी दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 19:03 IST

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा दुपारी ४ वाजेपर्यंत ७१.१० टक्क्यांवर

ठळक मुद्देपैठण ते माजलगाव धरणाचे अंतर १३२ किमी जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात पोहचण्यासाठी २४ तासाचा कालावधी

औरंगाबाद/बीड : जायकवाडी धरणातून पैठण उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात शुक्रवारी दुपारी ४०० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. येत्या दोन दिवसात जवळपास ३ टीएमसी पाणी धरणातून सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात माजलगाव धरणासाठी जवळपास २०० दलघमी पाणी कायम स्वरूपी आरक्षित आहे. सध्या माजलगाव परिसरात सरासरी पाऊस न झाल्याने धरणात अत्यंत कमी जलसाठा आहे. जायकवाडी धरणातून माजलगाव धरणाचे आरक्षित पाणी सोडण्यात यावे या बाबत मागणी होत होती.

आज दुपारी जायकवाडी धरणात ७०% पेक्षा जास्त जलसाठा झाल्याने माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. दरम्यान दुपारी दोन वाजता धरण अभियंता बुध्दभूषण दाभाडे, आर ई चक्रे आदीच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उजव्या कालव्याचे दरवाजे वर उचलून कालव्यात ४०० क्युसेक क्षमतेने पाणी सोडले. कालव्यातील विसर्ग टप्याटप्याने वाढवून तो जास्तीत जास्त ९०० क्युसेक पर्यंत वाढविण्यात येईल असे दाभाडे यांनी सांगितले. माजलगाव साठी पहिल्या टप्प्यात ७५ दलघमी पाणी सोडण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

नाशिक विभागात मागीण काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणीसाठा ७० टक्क्यांच्यावर पोहंचला  आहे. बीड जिल्ह्यात मात्र, अद्यापही पाऊस अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यामुळे माजलगाव धरणाची पाणी पातळी वाढलेली नाही. बीड शहराला पाली येथील बिंदुसरा व माजलगाव धरणातून पाणी पुरवठा केला जातो. बिंदुसरा धरण तर महिन्यापूर्वीच मृत साठ्यात गेले आहे तर माजलगाव धरणातील पाणी पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. बीडला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणातील उद्भवापासून जवळपास अडीचशे मिटर पाणी आत गेले आहे. त्यामुळे पालिकेने उपाययोजना म्हणून सात मिटर खोल व अडीचशे मिटर दुर अशी चारी खोदली आहे. याद्वारे सध्या पाणी उपसा केला जात आहे. सध्या जरी उपाययोजना केल्या असल्या तरी आतापर्यंत पाऊस पाहता ही परिस्थिती यापुढे गंभीर बनण्याची शक्यता आहे. 

( जायकवाडी ६३ टक्क्यांवर; मराठवाड्यातील उर्वरित प्रकल्पांत ठणठणाट )

हाच धागा पकडून बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री दिपक सावंत यांच्याकडे जायकवाडी धरणातून ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली होती. याबाबत मंत्रीमंडळाची बैठक झाली. रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही मागणी लावून धरली. याला बैठकीत मंजुरी मिळाली. यानंतर आज दुपारी जायकवाडीतून ४०० क्युसेक पाण्याच्या विसर्ग करण्यात आला. दरम्यान, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा दुपारी ४ वाजेपर्यंत ७१.१० टक्के झाला होता. जायकवाडी धरणात वरील धरणातून पाण्याची आवक सुरूच आहे. सद्या 71 हजार 335 क्यूसेसने गोदावरीमार्गे जायकवाडीत पाणी येत आहे. धरणाची पाणी पातळी पाहता यावेळी मराठवाड्यावरील दुष्काळाचे संकट टळले आहे .

जायकवाडी धरणात जलसाठा ७३% होत आल्याने आज माजलगाव धरणासाठी जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून ४०० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले. पैठण ते माजलगाव धरणाचे अंतर १३२ किमी असून जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात पोहचण्यासाठी २४ तासाचा कालावधी लागेल असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणी