शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरण @ ६६ टक्के; चार दिवसात १० टक्के पाणीसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:43 IST

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाच दिवसापासून या बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देदि १४ पासून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी मोठ्या क्षमतेने नाथसागरातजायकवाडी धरणात २२७५७ क्युसेक्स अशी आवक सुरू आहे

पैठण : स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने यंदा आत्मनिर्भर झालेल्या जायकवाडी धरणात गेल्या चार दिवसापासून नाशिकचे पाणी दाखल होत असल्याने जायकवाडी धरणाचा जलसाठा ६६ % झाला आहे. दि १४ पासून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी मोठ्या क्षमतेने नाथसागरात सामावले जात असून चार दिवसात जलसाठ्यात दहा टक्क्याने भर पडली आहे. सोमवारी धरणात २२७५७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू  होती . दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील धरणे भरत आल्याने या धरण समुहातून लवकरच विसर्ग होईल अशी अपेक्षा जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे.

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाच दिवसापासून या बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. आज सकाळी ११०७९ क्युसेक्स क्षमतेने या बंधाऱ्यातून विसर्ग करण्यात येत होता तो सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान १४२३४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. यामुळे गोदावरी दुथडी भरून वहात आहे. दारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग सायंकाळी ११५५० क्युसेक्स वरून ७६०८ क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आला. जायकवाडी धरणात २२७५७ क्युसेक्स अशी आवक सुरू आहे, दरम्यान नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात  होणाऱ्या विसर्गात वाढ झाल्याने धरणात येणारी आवक वाढणार असल्याचे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे व संदीप राठोड यांनी सांगितले. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी  सोमवारी सायंकाळी १५१५.२२ फूट झाली होती. जायकवाडी धरणात एकूण जलसाठा. २१६९.८९६ दलघमी तर उपयुक्त जलसाठा १४३१.७९० दलघमी ईतका झाला आहे.

भंडारदरा धरणातील पाण्याची प्रतिक्षा...अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ९६% भरले असून  भंडारदरा धरणातून ४३९९ क्युसेक्स क्षमतेने निळवंडे धरणात विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरण सोमवारी सायंकाळी ८०% भरले होते , निळवंडे  ९०% भरल्यानंतर या धरणातून ओझर वेअर मध्ये विसर्ग करण्यात येईल व हे पाणी प्रवरा नदी मार्गे जायकवाडीत दाखल होईल. येत्या दोन दिवसात निळवंडेतून विसर्ग सुरू होईल अशी अपेक्षा धरण नियंत्रण कक्षातून व्यक्त करण्यात आली. प्रवरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे देवगड बंधाऱ्यातून प्रवरा नदी पात्रात सोमवारी १७६९ क्युसेक्स असा विसर्ग सुरू होता असे राजेंद्र काळे यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील  धरणाची टक्केवारी.....करंजवन  ३५.३८%, वाघाड ३५.७१%,ओझरखेड ४३.०५%,पालखेड ६६.०२%,गंगापूर ८०.४५%,गौतमी ५०.७४%,कश्यपी ४०.७८%, कडवा ९२.८९%,दारणा ९०.०८%,

अहमदनगर जिल्ह्यातील धरणाची टक्केवारी.....भंडारदरा ९५.९३%निळवंडे ७८.४३%मुळा ६५.५५%.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस