शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरण ६० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:03 IST

धरणात ३२,५९१ क्युसेसने आवक : स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पैठण : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून होत असलेला विसर्ग ...

धरणात ३२,५९१ क्युसेसने आवक : स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

पैठण : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून होत असलेला विसर्ग व स्थानिक पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात ३२,५९१ क्युसेसने आवक होत आहे. सोमवारी रात्री ८ वाजता धरणाचा जलसाठा ६० टक्के झाला होता. पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात येणारी आवक वाढण्याची शक्यता धरण नियंत्रण कक्षातून वर्तविण्यात आली आहे. अपेक्षित जलसाठा झाल्याने नाथसागरातून सिंचनासह पिण्यासाठी व औद्योगिक क्षेत्राला नियोजित पाणीपुरवठा केला जाईल, असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.

गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून दारना ३० मि.मी, वाकी ६० मि.मी, भाम ५६ मि.मी, भावली ९९ मि.मी, गंगापूर ६५ मि.मी, कडवा ३४ मि.मी, वाघाग ३९ मि.मी, घोटी ७० मि.मी, इगतपुरी ९३ मि.मी, त्र्यंबकेश्वर ६० मि.मी अशा पावसाची नोंद झाली आहे. यामुळे काठोकाठ भरत आलेल्या तेथील धरण समूहातील दारणा ७२०० क्युसेस, कडवा २५४४ क्युसेस, गंगापूर ४००० क्युसेस व नांदुर मधमेश्वर वेअरमधून १६५८२ क्युसेसने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय स्थानिक जिल्ह्यातील शिवना, अहमदनगर जिल्ह्यातील भगूर व शेवगाव नद्यांना पूर आल्याने पाणी जायकवाडी धरणात येत असल्याने ३२,५९१ क्युसेस आवक जायकवाडीत होत असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी स्पष्ट केले. सोमवारी रात्री ८ वाजता धरणाचा जलसाठा ६० टक्के तर पाणीपातळी १५१३.७८ फूट होती. एकूण जलसाठा २०३६.१४७ दलघमी (७२टीएमसी) तर उपयुक्त जलसाठा १२९८.०४१ दलघमी (४६ टीएमसी) आहे.

-----------

जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणांची टक्केवारी

दारणा ९७.३, मुकणे ६६.२५, वाकी ६९.७२, भाम, भावली, वालदेवी आणि आळंदी १००, गंगापूर ९८.२६, गौतमी ८७.२६, कडवा ९९.१७, पालखेड ९४.४९, वाघाड ८६.२३ व पुणेगाव ७२.८७ टक्के आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून ७७४४ क्युसेस विसर्ग निळवंडे धरणात व निळवंडेतून ८१४४ क्युसेस विसर्ग ओझर वेअरमध्ये होत आहे. ओझर वेअर अद्याप बराच रिकामे असल्याने ओझर वेअरमधून प्रवरेच्या पात्रात विसर्ग अद्याप सुरू नसल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पाणी प्रतीक्षेत आहे. दरम्यान, पावसामुळे प्रवरेतून देवगड येथे १०६८ क्युसेसची आवक जायकवाडीसाठी मिळत असल्याचे गणेश खराडकर यांनी सांगितले.

---- फोटो