शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरण @ ६० % ; नाशिकच्या पाण्याचे नाथसागरात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 20:02 IST

यंदा नाशिक व नगर जिल्ह्यातून आवक झालेली नसताना जायकवाडी ५७%  भरले होते.

ठळक मुद्दे१८,७६२ क्युसेक्स क्षमतेने धरणात आवक सुरु जायकवाडी धरण यंदासुध्दा १००% भरण्याची आशा

पैठण : नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर वेअर मधून गुरूवारी सोडण्यात आलेले पाणी २४ तासाच्या अवधीनंतर जायकवाडीत आज सायंकाळी दाखल झाले.  जायकवाडी साठी हंगामातील नाशिकच्या पाण्याच्या शुभारंभ आज झाला असून जायकवाडी धरणात १८७६२ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. धरणाचा जलसाठा ६०% झाला असून धरणात येणारी आवक लक्षात घेता  जलसाठ्यात गतीने वाढ होईल अशी अपेक्षा कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे.

यंदा नाशिक व नगर जिल्ह्यातून आवक झालेली नसताना जायकवाडी ५७%  भरले होते.  स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे यंदा ही किमया घडली. नाशिक जिल्ह्यात  जोरदार पाऊस झाल्याने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गुरूवारी१६८६५ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग गोदावरी पात्रात  सुरू करण्यात आला. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेनंतर हे पाणी जायकवाडीच्या नाथसागरात येऊन धडकले. शुक्रवारी सुद्धा नाशिक ३८ मि मी, त्र्यंबकेश्वर ११० मि मी, ईगतपुरी १२० मि मी, व घोटी ९३ मि मी अशी जोरदार पावसाची नोंद झाली या मुळे  दारणा धरणातून ९९५६ क्युसेक्स , भावली धरणातून ९४८ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. गुरूवारपासून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात सुरू असलेला विसर्ग  १६८६५ क्युसेक्स कायम आहे. यामुळे नाशिक ते पैठण गोदावरी भरून वहात आहे.

जायकवाडी धरण ६०% भरले असून धरणाची पाणीपातळी १५१३.५९ फूटापर्यंत वाढली आहे. धरणात एकूण जलसाठा २०१८.९३२ दलघमी ( ७१.२८टिएमसी ) तर उपयुक्त जलसाठा १२८०.८२३ दलघमी ( ४५.२२ टिएमसी) ईतका झाला आहे अशी माहिती धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे व संदिप राठोड यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातील पाण्याची आवक सुरू झाल्याने जायकवाडी धरण यंदासुध्दा १००% भरेलच असा विश्वास कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीgodavariगोदावरी