शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

जायकवाडी @ ९८ टक्के; धरणाची चार दरवाजे उघडून २०९६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 19:49 IST

धरणाच्या द्वार क्रं १०, २७, १८, १९ मधून २०९६ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक  असा एकुण ३६८५ क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.

ठळक मुद्देजायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढलासायंकाळी सात वाजता धरणाची आणखी दोन दरवाजे उघडले

पैठण : जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात आज जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून आले. जलसाठा ९८% झाल्याने  रात्री ७ वाजेच्या दरम्यान आणखी दोन दरवाजे उघडण्यात आली. दरवाजा क्रमांक १८ व १९ हे दोन दरवाजे अर्धा फूटाने वर उचलून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. धरणाच्या द्वार क्रं १०, २७, १८, १९ मधून २०९६ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक  असा एकुण ३६८५ क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.

शनिवारी दुपारी जायकवाडी धरणाचे १० व २७ क्रमांकाची दोन दरवाजे अर्धा फूटाने वर उचलून नाथसागरातून १०४८ क्युसेक्स असा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. त्यानंतर धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत जलसाठा ९८% झाला. यामुळे रात्री ७ वाजेच्या दरम्यान दरवाजा क्रमांक १८ व १९ हे दोन दरवाजे अर्धा फूटाने वर उचलून विसर्ग वाढविण्यात आला.  प्रचलन आराखड्या नुसार जलाशयातील पाणी पातळी राखण्यासाठी धरणात येणारी आवक लक्षात घेऊन धरणातून होणारा विसर्ग कमी - जास्त करण्यात येईल मात्र परिस्थिती पाहता धरणात येणारी आवक सातत्याने घटत असल्याने धरणातून फारसा विसर्ग वाढवावा लागणार नाही असे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा श्रीगणेशा आज करण्यात आला. मुख्य अभियंता दिलीप तवार, अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांच्या हस्ते बटन दाबून धरणाचा दरवाजा क्रमांक १० व २७ अर्धा फूटाने वर उचलून गोदावरीत १०४८ क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. धरणाच्या द्वार क्रं १०, २७, १८, १९ मधून २०९६ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक  असा एकुण ३६८५ क्यूसेक इतका विसर्ग सुरू असल्याने गोदावरी पात्र भरभरून वहाते झाले आहे.जायकवाडी धरणात ६१८१ क्युसेक्स आवक शनिवारी सुरू होती, धरणाचा जलसाठा सकाळी ६ वाजता ९७.५७% च्या पुढे सरकला होता. राज्यस्तरीय धोरणानुसार आखलेल्या जलाशय प्रचलन आराखड्या नुसार जलाशयाची पाणीपातळी पुढे सरकल्याने जायकवाडी प्रशासनाने आवक होत असलेल्या पाण्याच्या तुलनेत अर्धे पाणी धरणातून सोडण्याचा निर्णय घेतला.

पैठण ते नांदेड गोदावरी पात्रात १४ बंधारेपैठण ते नांदेड गोदावरी पात्रात १४ बंधारे असून यात आपेगाव, हिरडपुरी, शहागड, पाथरवाला, जोगलादेवी, मंगरूळ, राजा टाकळी, लोणी सावंगी, ढालेगाव, तारूगव्हाण, मुदगल, मुळी, दिग्रस, व विष्णूपुरी बंधाऱ्याचा समावेश आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील शहागड व पाथरवाला या बंधाऱ्याचे दरवाज्याचे काम सुरू असल्याने ते मोकळे आहेत. तर गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे दरवाज्याचे काम सुरू असल्याने बंधारा मोकळा आहे. इतर बंधाऱ्यावरील यंत्रणेस दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

धरणातून सन १९७५ पासून विसर्ग..... यंदाचे २१ वे वर्ष.जायकवाडी धरणाच्या दरवाज्यांचे काम बाकी असताना १९७५ मध्ये पैठण येथून ३९८५२ क्युसेक्स विसर्ग झाल्याची नोंद आहे. १९७६ ला धरणाचे २७ दरवाजे ८" उचलून प्रथमच १५०,००० क्युसेक्स असा विसर्ग करण्यात आला. १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष  धरणातून विसर्ग करावा लागला. १९८२ ला विसर्ग करावा लागला नाही मात्र १९८३ ला ८०१९५ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला. १९८४ ते १९८७ या चार वर्षात धरणात अपेक्षित जलसाठा न झाल्याने विसर्ग करावा लागला नाही. १९८८ ला नाममात्र विसर्ग करण्यात आला. पुन्हा १९८९ हे वर्ष कोरडे गेले. १९९० ला महापूर आल्याने १८७६५२ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करावा लागला. १९९१ लाही ५९४०८ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग झाला. १९९२ ते १९९७ या सहा वर्षात १९९४ ला पाणी सोडावे लागले बाकीचे वर्षे कोरडेच राहिले. यानंतर १९९८ व ९९ सलग दोन वर्ष विसर्ग झाला.

२००० नंतर धरण भरण्याचे प्रमाण घटलेसन २००० ते २०२० या २१ वर्षाच्या दरम्यान  १४ वर्ष धरणातून पाणी सोडण्याचा प्रसंग आला नाही. २००० ते २००४ व २००९ ते २०१६ असे सलग व २०१८  या दरम्यान धरणातील जलसाठा काटकसरीने वापरावा लागला. मात्र या २१ वर्षात २००५ ते २००८ या दरम्यान धरणातून मोठ्या क्षमतेने पाणी सोडावे लागले.  २०१७ ला २७८४६ क्युसेक्स व २०१९ ला ५०३०४ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग केला गेला. यंदची सुरवात १०४८ क्युसेक्स क्षमतेने शनिवारी करण्यात आली.

सन १९९० व २००६ ला पैठण शहरात पूर.....१९९० ला १२ ऑक्टोबर रोजी धरणातून १८७६५२ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला होता. पैठण शहराखालील बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच उघडण्यात अपयश आल्याने पैठण शहरात पुर आला होता. २००६ ला धरणातून ऑगस्ट महिण्यात २,५०,६९५ असा मोठा विसर्ग करण्यात आल्याने सहा दिवस अर्धे पैठण शहर पाण्याखाली होते.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद