शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘मेड इन औरंगाबाद’ची जपानभरारी, औरंगाबादेतील कंपनीचा जपानी बँकेशी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:39 IST

औरंगाबाद : जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. भारतातील दिग्गज कंपन्याही तेथूनच सॉफ्टवेअर आयात करतात.

गजानन दिवाण औरंगाबाद : जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. भारतातील दिग्गज कंपन्याही तेथूनच सॉफ्टवेअर आयात करतात. हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न औरंगाबादने केला असून, मराठमोळ्या तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर लवकरच जपानच्या बाजारात दिसणार आहेत. यासंदर्भात औरंगाबादेतील ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’ कंपनीने अलीकडेच सॉफ्टबँक या जपानी कंपनीशी करार केला आहे.बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आनंद माहूरकर याने मोठ्या पगाराची नोकरी सोडून २०१० साली कंपनीची स्थापना केली. अमेरिकेतील बोस्टनमध्ये कंपनीचे मुख्यालय आहे. माहूरकर यांनी त्याचवर्षी कंपनीचे औरंगाबादेतही एक कार्यालय सुरू केले.आनंद यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अंबाजोगाईत झाले. आई-वडील दोघेही शिक्षक. औरंगाबादेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले. पुढे पुण्यात नोकरी केली. त्याचवेळी संगणकाचे ज्ञान घेतले. नंतर औरंगाबादेत नोकरी केली. कंपनीने त्यांच्यातील सॉफ्टवेअर अभियंत्याचे गुण हेरून त्यांना मुंबईला एका विशेष प्रकल्पावर पाठविले. १९९९ साली पुन्हा पुण्यात नवी नोकरी केली. त्यानंतर मुंबईतील एका कंपनीच्या माध्यमातून थेट अमेरिका गाठली. कंपनीचा व्यवसाय २५ कोटींवरुन ३५० कोटींवर नेला.आत्मविश्वास आल्यानंतर आपणच व्यवसायातून अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न का सोडवू शकत नाही, या विचारातून त्यांनी २०१० साली ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’ कंपनीची स्थापना केली. एकही पैशाची गुंतवणूक नाही. केवळ ‘आयडिया’ हीच त्यांची गुंतवणूक. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रात जगभरातील दिग्गजांच्या यादीत त्यांचे नाव पहिल्या काहींमध्ये घेतले जाते. हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे आपण कुठले कपडे घालायला पाहिजे, कुठली फॅशन सूट करते? तुमची पर्सनॅलिटी, तुमच्या विचारांचा अभ्यास करून कॉम्पुटरच तुम्हाला हे सांगेल. देशभरातील ४० प्रतिनिधींसमोर गुरुवार व शुक्रवारी औरंगाबादेत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा डेमो दाखविला जाणार आहे. लवकरच ही सॉफ्टवेअर औरंगाबादेत तयार केली जातील आणि जगभरात पुरविली जातील, अशी माहिती ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहूरकर यांनी ‘लोकमत’ला दिली. सॉफ्ट बँक या जपानी कंपनीने माझ्या कंपनीत ५० कोटींची गुंतवणूक केली. भारतातील कंपनीशी हे एकमेव जॉइंट व्हेंचर केले आहे. औरंगाबादेत टेक्नॉलॉजी डेव्हलप करुन ती जपानमध्ये नेऊन ते विकतील. तेथे आपण त्यांना कंपनीचा ५१ टक्के भाग दिला आहे. तेथे मार्केटची पूर्ण जबाबदारी त्यांचीच असेल, असे माहूरकर यांनी सांगितले.>औरंगाबादेतील एमआयटी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जेएनईसीच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. स्किल डेव्हलपमेंट केले जाईल. याच तरुणांना पुढे आपल्या कंपनीत सामावून घेतले जाईल.- आनंद माहूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद