शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जालना रोडचा पर्याय वर्षभरात होणार तयार; औरंगाबाद मनपाच्या स्थायी समितीत निविदा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:58 IST

जालना रोडला पर्याय म्हणून कैलासनगर ते एमजीएम रस्त्याच्या डांबरीकरण कामाची १३ कोटी ६७ लाख ८० हजार ८३१ रुपयांची निविदा गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली़  ए़ एस़ कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले असून, १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत आहे.

ठळक मुद्देजालना रोडला पर्याय म्हणून कैलासनगर ते एमजीएम रस्त्याच्या डांबरीकरण कामाची १३ कोटी ६७ लाख ८० हजार ८३१ रुपयांची निविदा गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली़  शहर विकास आराखड्यात एमजीएम ते कैलासनगर हा रस्ता १८ मीटर रुंदीचा आहे.  हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर जालना रोडवरची वर्दळ ३० टक्के कमी होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : जालना रोडला पर्याय म्हणून कैलासनगर ते एमजीएम रस्त्याच्या डांबरीकरण कामाची १३ कोटी ६७ लाख ८० हजार ८३१ रुपयांची निविदा गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली़  ए़ एस़ कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले असून, १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत आहे़  हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर जालना रोडवरची वर्दळ ३० टक्के कमी होण्याची शक्यता आहे. शहर विकास आराखड्यात एमजीएम ते कैलासनगर हा रस्ता १८ मीटर रुंदीचा आहे. तत्कालीन आयुक्त डॉ़  पुरुषोत्तम भापकर यांच्या काळात २०१२ मध्ये रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत या रस्त्यात बाधित असलेले अतिक्रमण हटविण्यात आले होते. 

पाच वर्षांपासून काम रखडल्यामुळे त्या रस्त्याच्या कामासाठी १३ कोटी ६७ लाख ८० हजार ८३१ रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने गुरुवारी मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवली. ए. एस. कन्स्ट्रक्शनने अंदाजपत्रकीय दरापेक्षा ५़ ५५ टक्के इतक्या दराने निविदा भरली. त्यामुळे त्या संस्थेची निविदा मंजूर झाली. १२ महिन्यांत हा रस्ता पूर्ण करण्याची मुदत निविदेत आहे़  हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर जालना रस्त्याला पर्यायी असलेला हा रस्ता वरद गणेश मंदिर, समर्थनगर ते एमजीएम असा राहील.दोन वर्षांपूर्वी शासनाने २४ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात शहरासाठी उपलब्ध करून दिला़  त्यातून क्रांतीचौक ते महावीर चौकपर्यंत रस्ता करण्याचा निर्णय झाला़; परंतु नंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या योजनेतून करण्याचे ठरले. त्यामुळे ठेवलेला सहा कोटी रुपयांचा निधी कैलासनगर ते एमजीएम रस्त्यासाठी वळविण्यात आला. दुसर्‍या टप्प्यात शासनाने दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून ५ कोटी रुपये राखीव त्यासाठी ठेवण्यात आले आहेत़ 

ते अडीच कोटी याच रस्त्यासाठीअडीच कोटींचा निधी हा माजी महापौर भगवान घडमोडे यांच्या प्रभागातील विकास कामांसाठी वळविला आहे़  हा निधी वळविण्यात येऊ नये, अशी मागणी सदस्यांनी केली. शहर अभियंता एस. डी. पानझडे म्हणाले, घडमोडे यांच्या वॉर्डातील कामे मनपाच्या निधीतून होतील. वळविण्यात आलेला अडीच कोटींचा निधी याच रस्त्यासाठी वापरण्यात येईल. दर दोन महिन्यात या कामाचा आढावा स्थायी समिती बैठकीत सादर करावा, अशी सूचना सदस्यांनी प्रशासनाला केली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिका