- सुनील पाटील जळगाव - महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजप–शिंदे सेना–राष्ट्रवादी युती महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र, हे कोडे अद्याप सुटलेले नसतानाच हा राजीनामा आल्याने चर्चांना उधाण आले आहे.राजीनामा देताना अभिषेक पाटील यांनी लोकमतचे बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विक्री झाली आहे, असा गंभीर आरोप करत थेट पक्ष नेतृत्वावर संधान साधले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने केवळ दोन ओळींचे राजीनामा पत्र देण्यात आले असून ते सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.जागा वाटपावरून निर्माण झालेल्या असंतोषातून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असून, या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत खदखद उघडपणे समोर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे जळगावच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Amid alliance confusion, NCP's Jalgaon president Abhishek Patil resigned, alleging party betrayal. He accused leadership of 'selling out' the party, sparking political turmoil before local elections. Discontent over seat allocation fuels speculation about new political alignments in Jalgaon.
Web Summary : गठबंधन की भ्रम की स्थिति के बीच, राकांपा के जलगांव अध्यक्ष अभिषेक पाटिल ने इस्तीफा दे दिया, पार्टी पर विश्वासघात का आरोप लगाया। उन्होंने नेतृत्व पर 'पार्टी को बेचने' का आरोप लगाया, जिससे स्थानीय चुनावों से पहले राजनीतिक उथल-पुथल मच गई। सीट आवंटन पर असंतोष ने जलगांव में नए राजनीतिक गठबंधनों के बारे में अटकलों को हवा दी।