शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगराव गायकवाडानीही बांधले बाशिंग; भाजपमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:05 IST

माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांची सध्या घोंघावते मराठा वादळ आपणास पुन्हा यश देईल, अशी आशा पल्लवित झाली आहे.

ठळक मुद्देदिवसभरात विविध पक्षांच्या २२ उमेदवारांनी घेतले ५० अर्ज विद्यमान आ. सतीश चव्हाण, भाजपचे शिरीष बोराळकर यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज घेतला. बीड जिल्ह्यातून तीन इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतले आहेत.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मि‌ळविण्यासाठी भाजपत स्पर्धा वाढली असून, अर्ज  घेण्याच्या  पहिल्याच दिवशी गुरुवारी भाजपच्या इच्छुकांनी सहा उमेदवारी अर्ज घेतले. माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांची सध्या घोंघावते मराठा वादळ आपणास पुन्हा यश देईल, अशी आशा पल्लवित झाली आहे. त्यांनी चार उमेदवारी अर्ज घेत  इच्छुकांच्या रांगेत नंबर लावला आहे. 

विभागीय आयुक्तालयातील सहायक निवडणूक अधिकारी विभागातून गुरुवारी दिवसभरात २२ उमेदवारांनी ५० अर्ज नेले. यामध्ये भाजपसाठी ६, वंचित बहुजन आघाडीकडून ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांच्यासाठी ४ उमेदवारी अर्ज नेण्यात आले. ८ अर्ज अपक्ष व अन्य पक्षांनी नेले आहेत. विद्यमान आ. सतीश चव्हाण, भाजपचे शिरीष बोराळकर यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज घेतला. बीड जिल्ह्यातून तीन इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी अर्ज नेण्यात आला. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून चव्हाण यांनी अर्ज घेतल्याची नोंद निवडणूक अधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे.

भाजपमध्ये बोराळकर, किशोर शितोळे, माजी मंत्री गायकवाड, प्रवीण घुगे यांच्यासह दोन अन्य नावे चर्चेत आहेत.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गटाचा ओढा शिरीष बोराळकर यांच्याकडे, तर शितोळे यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, आ. हरिभाऊ बागडे प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून खेचायचा असेल, तर मराठा कार्ड खेळण्याचा विचारही भाजपत सुरू आहे. त्यामुळे गायकवाड यांनी मैदानात उडी घेतल्याची चर्चा आहे.  शितोळे यांनी मात्र अजून अर्ज घेतलेला नाही.  उमेदवारी अर्ज नेण्याचा आकडा पाहता २२ उमेदवार तरी सध्या निवडणूक मैदानात येण्यास इच्छुक असल्याचे दिसते. 

भाजपचा उमेदवार कोण ? आज जाहीर होण्याची शक्यताभाजपचा उमेदवार कोण असेल, हे शुक्रवारी दिवसभरात ठरेल, अशी शक्यता आहे. पक्षाच्या गोटातून बोराळकर यांचे नाव आघाडीवर आहे. माजी खा. गायकवाड यांनी सांगितले, मी दोन वेळा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. माझी उमेदवारी नक्कीच जाहीर होईल. गुरुवारी उमेदवारी जाहीर होणार होती; परंतु निवड समितीने शुक्रवारी उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. गायकवाड यांनी १६ वर्षांपूर्वी या मतदारसंघाचे दोनदा नेतृत्व केले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarathwadaमराठवाडा