शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
7
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
8
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
9
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
10
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
11
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
12
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
13
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
14
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
15
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
16
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
17
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
18
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
19
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
20
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतील ओघ मंदावला

By admin | Updated: September 8, 2014 00:35 IST

पैठण : जायकवाडी धरणावरील धरणातून मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या विसर्गामुळे जायकवाडीत ३१८५० क्युसेक्स क्षमतेने पाणी दाखल होत आहे.

पैठण : जायकवाडी धरणावरील धरणातून मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या विसर्गामुळे जायकवाडीत ३१८५० क्युसेक्स क्षमतेने पाणी दाखल होत आहे. भंडारदरा धरणाचे पाणी रविवारी पहाटे जायकवाडीत दाखल झाल्याने २२०५० वरून आवक ३१८५० पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान रविवारी सकाळपासून वरील धरणातून विसर्ग घटविण्यात आला आहे. धरणात ३५ टक्के जलसाठा झाला आहे.१५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची रविवारी सायंकाळी पाणी पातळी १५०७.२८ इतकी झाली होती. धरणात एकूण जलसाठा १४८९.८२८ द.ल.घ.मी. झाला असून, यापैकी ७२१.७२२ द.ल.घ.मी. उपयुक्त (जिवंत जलसाठा) आहे. जायकवाडी धरणाच्या बंदिस्त पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस सुरू होता. या पावसाचे पाणी साठविण्यासाठी तेथील धरणात पॉकेट शिल्लक नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून या धरणातून विसर्ग वाढविण्यात येत होता शनिवारी नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून तब्बल ३१२५४ व ओझर वेअरमधून ७६४९ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे आवक चांगलीच वाढली होती.गेल्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रात कोठेही दखलपात्र पाऊस झाला नाही यामुळे वरील धरणातून रविवारी पहाटेपासून विसर्ग घटविण्यात येत होता. नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून शनिवार ६ रोजी ३१२५४ विसर्ग सुरू होता तो रविवारी सकाळी ६३१० क्यसेक्सपर्यंत घटविण्यात आला, तर ओझर वेअरमधून ७६४९ क्युसेक्स विसर्ग होत होता तो ३८८३ पर्यंत घटविण्यात आला. निळवंडीतून ओझर, वेअरमध्ये ६२१९ क्युसेक्स विसर्ग होत होता तो ३७९९ पर्यंत घटविण्यात आला. भंडारदराचे पाणी प्रथमच दाखल अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणे या मोसमात अनेकवेळा पूर्ण क्षमतेने भरली; परंतु या धरणातून जायकवाडीसाठी पाणी न सोडता दोन्ही धरणाच्या लाभक्षेत्रातील जलसाठे भरून घेण्यास प्राधान्य देण्यात आले यामुळे या धरणातून जायकवाडीस पाणी मिळते का नाही याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले होते. दरम्यान ६ रोजी दोन्ही धरणे १००% भरलेली असताना दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला व धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्यायच न राहिल्याने भंडारदरातून ८१२ क्युसेक्स, निळवंडेतून ६२१९ व ओझर वेअरमधून ७६४९ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. ओझर वेअर ते जायकवाडी धरण हे १२९ कि.मी. अंतर असून ओझर वेअरमधून सुटलेले पाणी जायकवाडीत पोहोचण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. हे पाणी रविवारी पहाटे जायकवाडीत दाखल झाले व आवक वाढली.