शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जय श्रीराम... काका-काकू, हे घ्या अयोध्येचे निमंत्रण..! जायचं बरं का नक्की!

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 28, 2023 19:29 IST

शहरातील २२ श्रीराम मंदिरांत आणि त्यासह लहान-मोठ्या सर्व मंदिरांत २२ जानेवारीला आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : १ ते १५ जानेवारीदरम्यान तुमच्या घरासमोर काही स्वयंसेवक येतील... ‘जय श्रीराम, काका-काकू, ही घ्या निमंत्रण पत्रिका... २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या नूतन बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याला सर्वांना जाणे शक्य नाही. यासाठी त्या दिवशी घराजवळील मंदिराला अयोध्या बनवा व तिथेच सर्वांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करा... आणि नंतर आपल्याला जमेल तेव्हा श्रीरामलल्लाच्या दर्शनाला सहपरिवार अयोध्येमध्ये यावे...’ असे आवाहन करतील. तेव्हा ते पत्रिका, अयोध्येतील मंदिराचे छायाचित्र व अक्षताही देणार आहेत.

अयोध्येहून आल्या दीड लाख निमंत्रण पत्रिकाश्रीराम जन्मभूमी निर्माणाधीन मंदिर व तिथे बालरूपातील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा यामुळे सर्व रामभक्तांचे लक्ष अयोध्येकडे लागले आहे. याच अयोध्येतून खास दीड लाखावर निमंत्रण पत्रिका शहरात आल्या आहेत. शहरवासीयांना खास अयोध्येहून हे निमंत्रण आले आहे. शहरवासीयांना या पत्रिका १५ दिवसांत पोहोचविण्यात येतील. पत्रिका दोन पानांची असून, एका पानावर विश्वातील रामभक्तांना आवाहन आहे तर दुसऱ्या पानावर अयोध्येतील नवीन मंदिराची माहिती आहे.

घरात पूजेसाठी मंदिराचे मोफत छायाचित्रपत्रिकेसोबतच अयोध्येतील मंदिराची दीड लाख छायाचित्रेही अयोध्येतून आली आहेत. श्रीरामभक्तांना पत्रिकेसोबतच हे छायाचित्रही मोफत देण्यात येणार आहे. २२ जानेवारीला छायाचित्र देवघरात ठेवून त्याची पूजा करावी, सायंकाळी घरासमोर पणत्या, दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा, हा ते देण्यामागील हेतू आहे.

पिवळ्या रंगातील ५ क्विंटल अक्षताशहरातील २२ श्रीराम मंदिरांत आणि त्यासह लहान-मोठ्या सर्व मंदिरांत २२ जानेवारीला आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या धार्मिक उत्सवात सहभागी होण्यासाठी रीतसर अक्षताही देणार आहेत. या अक्षता पिवळ्या रंगातील आहेत. यात तांदळाला हळद, अष्टगंध लावण्यात आले आहे. अशा पिवळ्या रंगातील ५ क्विंटल अक्षता १६ कलशांतून आल्या आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAurangabadऔरंगाबादAyodhyaअयोध्या