मानवत : तालुक्यासाठी भविष्यात टेक्सस्टाईल पार्क आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. बंडू जाधव यांनी पाथरी विधानसभा शिवसेनेच्या उमेदवार मीराताई रेंगे यांच्या प्रचारार्थव्यापार्यांच्या बैठकीत सांगितले. १0 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३0 वाजता पोरवाल जिनिंगमध्ये घेण्यात आलेल्या व्यापार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कल्याणराव रेंगे होते. बंडू जाधवम्हणाले, व्यापार्यांनीटेक्सस्टाईल पार्कसाठी प्रस्ताव तयार करावेत, केंद्रातून यासाठी करावा लागणारा पाठपुरावा करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.
बैठकीस व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय लड्डा, कृष्णा बाकळे, दत्तप्रसाद बांगड, प्रकाश पोरवाल, डॉ. राजकुमार लड्डा, डॉ. सोमाणी, संजय बांगड, तरुण बांगड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विष्णू मांडे, दीपक बारहाते, मारोती गज्रे, अशोक शिसोदे, शंकर तरटे, बंटी राठोड, दीपक पाटील, पिंटू निर्वळ, प्रभाकर शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. संजय कुलकर्णी यांनी आभार मानले. (वार्ताहर)