शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘जब तक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा!’ अवकाशातील ताऱ्याला डॉ. आंबेडकरांचे नाव

By स. सो. खंडाळकर | Updated: April 14, 2023 18:10 IST

उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या अंदाजे १० हजार ताऱ्यांपैकी आत्तापर्यंत फक्त ३३६ ताऱ्यांची रजिस्ट्री करून विविध शास्त्रज्ञ, राजकारणी, कलावंतांची नावे दिलेली आहेत. त्यात आता बाबासाहेबांची भर पडणार आहे.

छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत अनेक घोषणा दिल्या गेल्या. त्यापैकी ‘जब तक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा..!’ हीदेखील घोषणा होती. याला आता ६७ वर्षे पूर्ण झाल्यावर अंशत: मूर्त रूप आले आहे. मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी अवकाशातील एका ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे. बाबासाहेबांच्या १३२ व्या जयंतीदिनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ताऱ्याचे लाँचिंग झाले. अँड्रॉइड व ॲपल युजर्स हा तारा ॲप डाऊनलोड करून पाहू शकतात.

अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी ‘इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री’ नावाची एक संस्था अमेरिकेत आहे. या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावे दिली जातात. फ्रान्समध्येही अशीच एक संस्था आहे. शंभर डॉलर म्हणजेच भारतीय चलनात नऊ हजार रुपये शुल्क भरून एका ताऱ्याची रजिस्ट्री केली जाते. त्या संस्थेकडे बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद व्हावी म्हणून ९ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्ज केला होता. महिनाभराने शिंदे यांना त्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. https://space-registry.org या स्पेस रजिस्ट्री ॲपच्या संकेतस्थळावरून हा तारा मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर पाहता येणार आहे. त्याशिवाय अँड्रॉइड, किंबहुना आयफोनवरूनही हा तारा पाहता येईल.

कुणाचीही नावे देता येत नाहीत, कुणीही ‘स्टार नेमिंग’ संस्थेशी संपर्क करून आमच्या नातेवाइकांचे नाव ताऱ्याला द्या, असे अजिबात चालत नसते. त्यासाठी विविध कागदपत्रांची पडताळणी केली जाते. नाव दिले जाणाऱ्या व्यक्तीचे खूप व्यापक काम असावे लागते. आम्ही दीड महिन्यापासून प्रक्रिया करत होतो. त्याला आता कुठे यश आले आहे, असे सर्वपक्षीय आंबेडकर जयंती महासमितीचे अध्यक्ष राजू शिंदे यांनी सांगितले.

असा पाहता येईल तारा द इनाेव्होटिव्ह युनिव्हर्स स्टार फाइंडर थ्रीडी स्मार्टफोन ॲप फॉर अँड्रॉइड अँड आयओेएसवरूनही हा तारा पाहता येणार आहे. त्याशिवाय प्ले स्टोरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग नावाने ॲप डाऊनलोड करून घेता येईल. ॲपमध्ये गेल्यावर रजिस्ट्रीचा CX26529US हा क्रमांक टाकल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव दिसू शकेल. विकिपीडियावरील माहितीनुसार, उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या अंदाजे १० हजार ताऱ्यांपैकी आत्तापर्यंत फक्त ३३६ ताऱ्यांची रजिस्ट्री करून विविध शास्त्रज्ञ, राजकारणी, कलावंतांची नावे दिलेली आहेत. त्यात आता बाबासाहेबांची भर पडणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरAurangabadऔरंगाबाद