शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हे तर ‘एमआयएम’ विरुद्ध युतीचे षड्यंत्र; इम्तियाज जलील यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:10 IST

मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाविरुद्ध महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने षड्यंत्र रचून पाच नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव घेतला. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येईल. शासनाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. तेथेही नगरसेवकपद रद्द झाल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत, असे प्रतिपादन रविवारी आ. इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्देदमडी महल येथील अतिक्रमण पाडताना मनपा अधिकार्‍यांवर दबाव टाकल्याच्या आरोपातून शनिवारी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यासंदर्भात पत्रकार परिषदेत आ. जलील पुढे म्हणाले की, ज्या नियमानुसार आमच्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली, त्या नियमात नगरसेवक बसतच नाहीत

औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाविरुद्ध महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने षड्यंत्र रचून पाच नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव घेतला. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येईल. शासनाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. तेथेही नगरसेवकपद रद्द झाल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत, असे प्रतिपादन रविवारी आ. इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत केले.

दमडी महल येथील अतिक्रमण पाडताना मनपा अधिकार्‍यांवर दबाव टाकल्याच्या आरोपातून शनिवारी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव त्वरित शासनाकडे पाठविण्याचे आदेशही महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. यासंदर्भात पत्रकार परिषदेत आ. जलील पुढे म्हणाले की, ज्या नियमानुसार आमच्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली, त्या नियमात नगरसेवक बसतच नाहीत. अतिक्रमण कारवाईत नगरसेवकांनी अडथळा निर्माण केला तर नगरसेवकपद रद्द होऊ शकते. आमचे नगरसेवक कारवाई करा म्हणून घटनास्थळी हजर होते. कायद्याचे ज्ञान आम्हालाही आहे. शासन यावर योग्य तो निर्णय घेईल. कारवाई झालीच तर आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत.

मागील ३० वर्षांमध्ये मनपावर युतीची सत्ता आहे. या तीन दशकांमध्ये शहराचा युतीनेच सत्यानाश केला. टीडीआरची ज्या पद्धतीने विधानसभेतून चौकशी लावली त्याच पद्धतीने आणखी बरेच घोटाळे समोर आणण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला. युतीने आमच्या विरोधात युद्ध पुकारले असून, आम्हीसुद्धा यासाठी सक्षम आणि तयार आहोत. पत्रकार परिषदेला डॉ. गफ्फार कादरी, विरोधी पक्षनेते फेरोज खान, गटनेते नासेर सिद्दीकी, नगरसेवक जमीर कादरी, गंगाधर ढगे, शहराध्यक्ष अब्दुल समीर, आरेफ हुसैनी, शेख अहेमद आदींची उपस्थिती होती.

चार वेळा पथक परतलेदमडी महल येथे श्रीराम पवार यांचे घर पाडण्यासाठी मनपाचे पथक चार वेळेस गेले. प्रत्येक वेळी पथकाला माघारी फिरावे लागले. पथकाला कोणी माघारी फिरायला लावले, याचीही चौकशी मनपा आयुक्तांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली. महापौर-उपमहापौर आपल्या पदाचा दुरुपयोग करीत आहेत. उलट त्यांच्यावरच कारवाई करावी, अशी मागणी मनपा आयुक्त, विभागीय आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. कोणत्या पदाधिकार्‍यांनी कुठे अतिक्रमण केले हेसुद्धा आम्ही बाहेर काढणार असल्याचे जलील यांनी सांगितले.

गरिबांना पाणी नाही अन्...शहरातील अनेक वसाहती तहानलेल्या असताना बीड बायपासवरील श्रीमंत व्यक्तींच्या वसाहतींना पाणी देण्यासाठी मनपा आयुक्तांवर दबाव टाकण्यात येतो, अशी सर्व प्रकरणे आता बाहेर काढण्यात येणार आहेत.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका