शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार- निपुण विनायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:13 IST

महापालिकेची गाडी रुळावर येण्यासाठी थोडा वेळ निश्चितच लागणार असल्याचे मत नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उंचीवर गेल्यानंतर मला भीती वाटत होती. ही भीती घालविण्यासाठी मी पॅराग्लाइडिंग करायला लागलो. औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणून काम करण्याचे आव्हानही असेच मोठे आहे. एका दिवसात महापालिकेचे चित्र बदलणार नाही. नागरिकांमध्ये मनपाबद्दल विश्वास निर्माण करणे, प्राधान्यक्रमाने कचरा, पाणी या प्रश्नांचा निपटारा करणे आवश्यक आहे. महापालिकेची गाडी रुळावर येण्यासाठी थोडा वेळ निश्चितच लागणार असल्याचे मत नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केले.मंगळवारी सायंकाळी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच बुधवारी सकाळी ८ वाजेपासून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. सायंकाळी पत्रकारांसोबत मनमोकळेपणे गप्पा मारताना त्यांनी नमूद केले की, चंदीगड हे माझे मूळ गाव, एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यावर २००१ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालो. दिल्लीत मागील पाच वर्षांपासून काम करीत होतो. त्यापूर्वी मराठवाड्यात नांदेड महापालिका, जालना येथेही काम केले आहे. औरंगाबाद महापालिकेचा मी सध्या बारकाईने अभ्यास करतोय. साधारण आठ ते दहा दिवसांचा अवधी लागेल. आजच वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत बसून आढावा घेतला. कोणत्याही कामासाठी नागरिकांना महापालिकेत येण्याची गरज नाही. वॉर्ड अधिका-यांनी स्वत: आयुक्त म्हणून काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत. महापालिकेत आव्हाने खूप आहेत. प्रशासनाला स्वत:मध्ये व्यावसायिकपणा आणावा लागेल. अधिका-यांची टीम तयार करावी लागणार आहे. प्रत्येक समस्येसाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, उल्लेखनीय कार्य करणा-या संस्थांसोबत पार्टनरशिप करावी लागेल. लोकसहभाग वाढणेही तेवढेच महत्त्वाचे वाटते.नागरिक चांगल्या कामासाठी एक पाऊल पुढे आल्यास महापालिका प्रशासन नऊ पावले पुढे जाईल. लोकांना सांगण्यापेक्षा स्वत: आधी करून दाखविण्यावर आपला अधिक विश्वास आहे. शहराची बलस्थाने कोणती हे लक्षात घेऊन काम करण्यात येईल. कच-याचे शहर ही प्रतिमा पुसून काढण्यात येईल. प्रशासन आणि नागरिक, अशी एक चेन तयार करण्यात येणार आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcommissionerआयुक्त