शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

महिनाभरापूर्वीच झालो होतो प्रदेशाध्यक्ष : रावसाहेब दानवे

By admin | Updated: February 5, 2015 00:53 IST

उस्मानाबाद : प्रदेशाध्यक्ष म्हणून आज मी तुमच्यासमोर येत असलो तरी निवड जाहीर व्हायच्या एक महिना अगोदरच प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे नाव निश्चित झाले होते

उस्मानाबाद : प्रदेशाध्यक्ष म्हणून आज मी तुमच्यासमोर येत असलो तरी निवड जाहीर व्हायच्या एक महिना अगोदरच प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे नाव निश्चित झाले होते, असा गौप्यस्फोट भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. विधानसभा निवडणुकीत तुम्ही हिंमतीने मते घेतली आहेत. हिंमत दाखविणाऱ्यांच्या पाठिशी राहण्याचा माझा स्वभाव आहे. त्यामुळे या जिल्ह्याला वेगळ्या पालकमंत्र्याची गरज नाही. यापुढे या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे पालकत्व मी स्वत: स्वीकारणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रदेशाध्यक्ष निवडीसंदर्भात चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला बोलावून घेतले. केंद्रात गरज होती म्हणून तुम्हाला बोलावले. पण, महाराष्ट्र भाजपासाठी आता तुमची गरज आहे. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात जायचे की केंद्रात राहण्याची तुमची इच्छा आहे, असे त्यांनी विचारले. यावर एवढा मोठा निर्णय मी कसा घेऊ? तुम्ही सांगाल ती जबाबदारी स्वीकारेन, असे मी त्यांना सांगितले. त्याच वेळी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली होती. मात्र, निवड जाहीर होईपर्यंत मी याबाबत एक शब्दही कोणाशी बोललो नसल्याचे सांगत एखादी गोष्ट पोटात ठेवताही आली पाहिजे, असे ते म्हणाले. आयुष्यात २३ निवडणुका लढविल्या. त्यातील २२ निवडणुका जिंकल्याचे सांगत कामानेच माणूस मोठा होतो. कसलाही राजकीय वारसा नसताना ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री या सर्व जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे सांभाळल्या. त्यामुळेच मागणी केलेली नसतानाही प्रत्यके पद माझ्याकडे चालून आल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागा जिंकण्याची खुणगाठ बांधा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांनी पक्ष नोंदणीवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. कालपर्यंत ४१ लाख सदस्य नोंदणी झाली असून, ३१ मार्चपर्यंत १ कोटी सदस्य नोंदणी करण्यात भाजपाला यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीला रोहन देशमुख, अविनाश कोळी, अ‍ॅड. अनिल काळे, संताजी चालुक्य, रामभाऊ पडवळ, धनंजय शिंगाडे, लक्ष्मण माने, सत्यवान सुरवसे, रामदास कोळगे, तालुकाध्यक्ष शिंगाडे, बंटी मंजुळे, रेवण भोसले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)