शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हे ट्युलीप की जलपर्णी ? तुम्ही घरी नेमके काय नेत आहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 13:47 IST

शहरभर आले विक्रेते : तुम्ही घरी नेमके काय नेत आहात

बापू साेळुंके औरंगाबाद : ट्युलिप, गुलजरा या फुलझाडांची कलमे असल्याचे सांगून  शहरातील विविध रस्त्यांवर रोपे विक्रीला आलेली आहेत. लागवडीनंतर या रोपांना रंगीत फुले येतात, असे विक्रेते सांगत आहेत. विशेष म्हणजे कोणत्या रंगाचे फुले येतील हे सांगण्यासाठी रोपांच्या कलमांनाच विविध रंग लावण्यात आले. रोपे कोणत्या प्रकारची आहे, हे कळू नये, अशी रोपांची पाने छाटण्यात आल्याचे दिसून येते. 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध रस्त्यांवर टोपलीभर हिरवीगार कलमे विक्रीसाठी आलेली आहे. ५० रुपयांना एक आणि  १०० रुपयांत तीन कलमे या दराने ही  विक्री होत आहे. रोपे विकणाऱ्याच्या एका हातात कलम तर दुसऱ्या हातात ट्युलिप नर्सरीचे छायाचित्र आहे. ही छायाचित्रे दाखवून ही रोपे ट्युलिपची असून रोप लावल्यानंतर १५  दिवसांत फुले येतात.  शिवाय वर्षभर फुले येत असतात, असे सांगितले जात आहे. गुलाबी, पिवळा, निळा आणि शुभ्र रंग या रोपांच्या शेंड्याजवळ लावलेला आहे. ज्या रंगाचे रोप त्या रंगाचे फुले येतील, असा दावा हे विक्रेते करतात. आकाशवाणीसमोर रोपे विक्री करणारी ललिता बेलदार (रा.एरंडोल, जि. जळगाव) यांना या रोपाविषयी विचारले असता, सुरुवातीला तिने ही ट्युलिपची रोपे असल्याचे सांगितले. तुम्ही कधी ट्युलिपची नर्सरी पाहिली का, असे विचारल्यानंतर तिने नकारार्थी उत्तर दिले. ती पतीसह अन्य सुमारे ४० ते ५० लोक ही रोपे विक्री करण्यासाठी शहरात आल्याचे तिने सांगितले. ही कलमे सुरत येथील ठेकेदार त्यांना आणून देतो, असेही तिने सांगितले. पंधरा दिवसांत फुले येतील असे, ठेकेदारांनी सांगितल्याचे तिचे म्हणणे आहे. 

ट्युलीप नव्हे ही तर इकॉर्निया जलपर्णीट्युलिप या फूलझाडाच्या नावाखाली शहरात इकॉर्निया ही जलपर्णी विक्री केली जात असल्याचे दिसून येते. ही जलपर्णी फक्त प्रदूषित पाण्यावर वाढते. नागरिकांनी ट्युलिप म्हणून खरेदी केलेले रोपटे फेकून देऊ नका. ती मुळासह नष्ट करा, अन्यथा ही  जलपर्णी नदी-नाल्यात फेकून दिल्यास  तिची झपाट्याने वाढ होते. शिवाय ती अपायकारक आहे.-डॉ. भारतभूषण पंडित, वनस्पतीशास्त्रज्ञ

शहरातील रस्त्यावर विक्री करण्यात येत असलेले हिच ती कथीच ट्युलीप कलमे व इन्सॅटमध्ये ट्युलीपची खरी चित्रे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद