शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चलनातून बाद केलेले ७५ कोटींचे मुद्रांक नष्ट करण्यास लागले २० तास

By विकास राऊत | Updated: December 29, 2023 14:25 IST

कोषागारात कारवाई, सकाळी सात वाजेपासून यंत्रणा लागली होती कामाला

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सुमारे ७५ कोटी १३ लाख रुपयांचे मूल्य असलेले मुद्रांक गुरुवारी सकाळी सात वाजेपासून जिल्हा कोषागार कार्यालयात (ट्रेझरी) गोपनीयरीत्या नष्ट करण्यासाठी सुमारे २० तास लागले. मशीनच्या साहाय्याने मुद्रांकांचे तुकडे करून ते जाळण्यात आले. 

२०१४ पासून शासनाने चलनातून बंद केलेले ते मुद्रांक होते. एक ते २५ हजार किमतीच्या मुद्रांकांचा त्यात समावेश होता. १०० व ५०० रुपयांचे मुद्रांक सध्या चलनात असून त्यापुढे ई-चलनाचा वापर होतो. दोन दशकांपासून कोषागार कार्यालयात मुद्रांकाचा साठा पडून होता. वीस वर्षांंनंतर कोषागारच्या ताब्यात असलेले मुद्रांक नष्ट करण्याचे आदेश शासनाने गेल्या महिन्यांत सर्व जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार जिल्हा मुद्रांक अधिकारी विवेक गांगुर्डे, कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुरुवारी सकाळी सात वाजता ७५ कोटी १३ लाख रुपयांचे मुद्रांक नष्ट करण्यास सुरुवात केली.

२० वर्षांपूर्वी मुद्रांक घोटाळा झाला होता. घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्यामुळे शासनाने कोषागार कार्यालयात शिल्लक असलेले विनाक्रमांकाचे मुद्रांक पेपर विक्री न करण्याचे आदेश दिले होते. तेलगीच्या घोटाळ्यानंतर प्रत्येक मुद्रांक क्रमांकासह मिळत असून त्याचे डिझाइनही बदलले.

त्या मुद्रांक घोटाळ्याशी संबंध नाही...तेलगी मुद्रांक घोटाळ्याशी याचा संबंध नाही, असा दावा कोषागार विभागाने केला. जुने मुद्रांक चलनातून बंद केल्यामुळे त्यांचे निश्चलीकरण (चलनातून बाद) करणे गरजेचे होते. त्यामुळे शासनाने पूर्ण राज्यातील ३ हजार कोटींचे मुद्रांक नष्ट करण्यासाठी गेल्या महिन्यात आदेश काढले. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमधील ७५ कोटी १३ लाख रुपयांचे मुद्रांक नष्ट करण्यात आल्याचे कोषागार सूत्रांनी सांगितले. मुद्रांक कस्टोडियनच्या देखरेखीत नष्ट केले. प्रधान मुद्रांक नियंत्रकांना त्याचा अहवाल पाठविल्यानंतरच सगळी यंत्रणा काेषागार कार्यालयाबाहेर पडली.

किती मूल्यांचे होते मुद्रांक?मुद्रांक....................मूल्य१ हजार रुपये..........१२ कोटी ९० लाख रु.५ हजार रुपये............४६ कोटी ८० लाख रु.१० हजार रुपये..........५ कोटी ९७ लाख रु.१५ हजार रुपये..........१ कोटी ४६ लाख रु.२० हजार रुपये..........६ कोटी रु.२५ हजार रुपये...........२ कोटी रु.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग