शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात बड्या बिल्डरांवर आयटीचे छापे; डझनभर ठिकाणी पहाटेच पथक धडकले

By सुमित डोळे | Updated: November 30, 2023 12:19 IST

महिन्याभरातच शहरात दुसऱ्यांदा आयटीच्या कारवाईमुळे उद्योजकांसह बाजारेपठेत खुमासदार चर्चांना पेव फुटले होते.

छत्रपती संभाजीनगर : गुरूवारी पहाटेच शहरातील बड्या बांधकाम व्यवसायिकांच्या घरांसह कार्यालयांवर आयटीने छापे टाकले. यात जवळपास पाच मुख्य बांधकाम व्यवसायिकांसह त्यांच्याशी संबंधित गुंतवणूकदार व अन्य प्रायोजकांचीही यात चौकशी सुरू असल्याचे वरीष्ठ सुत्रांनी सांगितले. महिन्याभरातच शहरात दुसऱ्यांदा आयटीच्या कारवाईमुळे उद्योजकांसह बाजारेपठेत खुमासदार चर्चांना पेव फुटले होते.

वरीष्ठसुत्रांच्या मते, राज्यभरातील विविध ठिकाणच्या मुख्य कार्यालयातून आयटीचे जवळपास २०० पेक्षाअधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकासाठी या छाप्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील बांधकाम क्षेत्रात मोठ्या गुंतवणूक झाल्या. पैठण रोड, सातारा, देवळाई, शेंद्रासह शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये मोठ्या प्रकल्पांना सुरूवात झाली. यात अब्जो रुपयांची गुंतवणूक झाल्याचे क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्व प्रकल्पांमधील व्यवहार तपासण्यासाठी, काही अनियमिततेच्या संशयावरुन ही छापेमारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्य पाच व संबंधितांचे कार्यालयमुंबई व राज्यातील आयटी विभागाच्या अन्य कार्यलायातून पहाटे साडेपाच वाजताच पथकांनी कारवाईस प्रारंभ केला. सुरूवातीला निवासस्थानांसह मुख्य कार्यालयांकडे पथकांनी कुच केली. सकाळी १० वाजेनंतर काही बांधकाम व्यवसायिकांच्या पूर्ण झालेल्या, पूर्णत्वास येत असलेल्या व त्याशिवाय ग्राहकांनी ताबा घेतलेल्या प्रकल्पांमध्ये देखील ही पथके गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  गुरूवारी दुपारपर्यंत मात्र आयटीकडून यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नव्हती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIncome Taxइन्कम टॅक्सCrime Newsगुन्हेगारी