शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अधिक मासात पुरुषोत्तमपुरीला जाणे शक्य नाही; मग शहरात घ्या लक्ष्मी नारायणाचे दर्शन

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 15, 2023 16:00 IST

छत्रपती संभाजीनगरात तीन मंदिरात भगवान विष्णू-लक्ष्मीच्या मूर्ती

छत्रपती संभाजीनगर : अधिक मासाला १८ जुलैपासून सुरुवात होत आहे. या महिन्यास पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. संपूर्ण भारतात भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर माजलगाव तालुक्यातील क्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे आहे. अधिकमासात राज्यभरातील लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. मात्र, ज्या भाविकांना काही कारणास्तव तिथे जाता येत नाही. त्यांच्यासाठी छत्रपती संभाजीनगरात ‘लक्ष्मी-नारायणा’चे तीन मंदिर आहेत. या मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल.

हर्सुलमध्ये मंदिरहर्सुलची ग्रामदेवता हरसिद्धी माता मंदिराच्या लगतच लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. भगवंतांसोबत लक्ष्मीची मूर्ती आहे. काळापाषाणातील या मूर्तींना चांदीचे डोळे बसविण्यात आले आहे. अधिक मासात येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.

शिवशक्ती कॉलनीत मंदिरजालना रोडवर सेंट फ्रान्सिस हायस्कूलसमोर शिवशक्ती काॅलनी आहे. कॉलनीतील प्रवेशद्वारात प्रवेश करताच उजव्या बाजूला ‘लक्ष्मीनारायण मंदिर’ आहे. १९८६ या वर्षी हे मंदिर उभारण्यात आले. येथील लक्ष्मी-नारायणाच्या मूर्ती संगमरवरी आहेत. दोन्ही मूर्तींना दागिन्यांनी मढविले आहे.

काल्डा कॉर्नरला मंदिरलक्ष्मी-नारायणाचे तिसरे मंदिर काल्डा कॉर्नर येथे बाबा हरदासराम नगरात मुख्य रस्त्यालगतच आहे. येथेही २५ ते ३० वर्षांपूर्वी जयपूरहून लक्ष्मी-नारायणाची मूर्ती आणण्यात आली. हर्सूल व शिवशक्ती कॉलनीतील मंदिरापेक्षा येथील भगवंतांची मूर्ती मोठी आहे. भगवंतांच्या चार भुजा असून शंख, चक्र, गदा धारण केलेले आहे. लवकरच या मंदिराचा जीर्णोद्वार होणार असल्याची माहिती मंदिराचे अभ्यासक प्रा. अनिल मुंगीकर यांनी दिली.

लक्ष्मी-नारायणाचे दर्शन घ्यावेपुरुषोत्तम मास अर्थात धोंड्याचा महिना. या महिन्याला हिंदू धर्मात असाधारण महत्त्व आहे. पुरुषोत्तम म्हणजे भगवान विष्णू होय. पुरुषोत्तमपुरीत मंदिरात फक्त पुरुषोत्तम (भगवान विष्णू)ची मूर्ती आहे.

अधिक मासात दर्शन फलदायी पुरुषोत्तम मासात तिथे जाऊन भगवंतांचे दर्शन घेण्याला शास्त्रात जास्त महत्त्व देण्यात आले आहे. मात्र, ज्यांना तिथे जाता आले नाही, त्यांच्यासाठी शहरातच भगवंताचे ३ मंदिर उभारण्यात आले आहे. तिन्ही मंदिरात लक्ष्मी-नारायण (भगवान विष्णू-लक्ष्मी) यांची मूर्ती आहे. त्यांचे दर्शन घेतले पाहिजे.- वे.शा.सं. सुरेश केदारे गुरुजी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक