शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त बनलेली कलचाचणी परीक्षा आता मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 19:38 IST

दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली कलचाचणी परीक्षा आता मोबाईलवर घेतली जाणार आहे.

औरंगाबाद : दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली कलचाचणी परीक्षा आता मोबाईलवर घेतली जाणार आहे. मोबाईल अ‍ॅपवर ही परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, हे जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने श्यामची आई फाऊंडेशनच्या माध्यमातून कलचाचणी घेतली जाते. शिक्षण विभाग, विद्या प्राधिकरण आणि श्यामची आई फाऊंडेशन या तिघांनी मिळून हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा ही कलचाचणी मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय प्रत्येकी २  प्रतिनिधी आणि एक मास्टर ट्रेनरला प्रशिक्षण देण्यात येईल. मास्टर ट्रेनरला श्यामची आई फाऊंडेशन प्रशिक्षण देईल़  हे मास्टर ट्रेनर प्रत्येक जिल्ह्यातील शाळांना संबंधित मोबाईल अ‍ॅप कसे हाताळायचे त्याबाबत प्रशिक्षण देईल.

आणखी एक काम शिक्षकांवर वाढणार आहे. त्यामुळे याविषयी शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. मोबाईल अ‍ॅप कलचाचणीसाठी विभाग, जिल्हा, तालुकास्तरावर समन्वयक नेमणार आहेत. कलचाचणी शाळेमध्येच घेणार आहे. त्यामुळे शाळेतील सर्व जबाबदार कर्मचाऱ्यांना ओटीपी आणि इतर माहितीसाठी मोबाईल नंबर नोंदविणे गरजेचे आहे. 

कलचाचणीसाठी अपेक्षित सामग्री प्रशिक्षणासाठी तंत्रस्नेही शिक्षकांकडे अँड्रॉईड मोबाईल फोन आवश्यक आहे. प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येणारी कल मापन चाचणी ही प्रत्येक शाळेतून मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार आहे़  त्यामुळे संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा किंवा जबाबदार कर्मचाऱ्यांचा मोबाईल नंबर तसेच शाळेचा यू-डायस क्रमांक या महत्त्वाच्या अनुषंगिक बाबी आवश्यक आहेत. 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रState Governmentराज्य सरकार