शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लीज होल्डचे फ्री होल्ड करण्याचा मुद्दा क्लिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 16:27 IST

अध्यादेशात शासनाने स्पष्टपणे काहीही सूचना दिलेल्या नाहीत.

ठळक मुद्देशासकीय अध्यादेशात स्पष्टतेचा अभावसिडको संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतरच दूर होणार संभ्रम 

औरंगाबाद : लीज होल्डचे फ्री होल्ड करण्याचा गुंत्ता सध्या तरी किचकट आणि क्लिष्ट होऊन बसला आहे. सिडको संचालक मंडळाची जानेवारी महिन्यात बैठक होणार असून, त्यामध्ये या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. २० डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या लीज होल्डवरील मालमत्ता फ्री होल्डवर करण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार शासकीय अध्यादेशही निघाला; परंतु त्या अध्यादेशात शासनाने स्पष्टपणे काहीही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत भूखंड, सदनिका, व्यावसायिक वापराचे भूखंड लीजवरून फ्री होल्डसम करण्याबाबत नेमके काय करायचे आहे, यावर चर्चा होणार आहे. 

एकरकमी शुल्क भूखंडांच्या आकारात लाखो रुपयांच्यावर जात असल्यामुळे नागरिक सध्या संभ्रमात आहेत. लीज होल्डचे फ्री होल्डसम करण्याबाबत घोषणा केल्यानंतर १२ दिवसांपासून नागरिकांनी हस्तांतरण संचिकांचे काय झाले याची विचारणादेखील सिडको कार्यालयाकडे केलेली नाही. त्यामुळे प्रशासनही याप्रकरणात खूप काही बोलण्यास तयार नाही.

रेडिरेकनर दरांचा विचार होणारसिडकोने विकसित केलेल्या सर्व योजना, भूखंड लीजवरून फ्री होल्डसम करण्यासाठी सध्याच्या जमिनीच्या रेडिरेकनर दरांचा विचार केला जाणार आहे. झोननिहाय रेडिरेकनरच्या दरांची माहिती संकलित केल्यानंतर पुढे काय करायचे, याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होणे शक्य आहे. रहिवासी भूखंडांसाठी ५ ते २० टक्क्यांपर्यंत एकरकमी, तर व्यावसायिक भूखंडांसाठी २५ ते ३० टक्क्यांचे शुल्क आकारण्याबाबत शासनाने अध्यादेशात म्हटले आहे. 

घोषणा फसवी असल्याचा आरोपसभापती राजू वैद्य, सेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी सदरील घोषणा फसवी असल्याचा आरोप केला आहे. लीज होल्डचे फ्री होल्ड केल्याचे घोषित केले. मात्र, १२ दिवसांपासून शासनाने याबाबत स्पष्टपणे काहीही सूचना सिडको कार्यालयाला केल्या नाहीत. याप्रकरणी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा सेनेने दिला आहे.

सिडको प्रशासकांचे मत असेशासनाने प्राथमिक स्तरावर जो निर्णय घेतला आहे, तेवढीच माहिती आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत अधिकची माहिती मिळू शकेल, असे सिडको प्रशासक पंजाबराव चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :cidcoसिडकोAurangabadऔरंगाबादcidco aurangabadसिडको औरंगाबादState Governmentराज्य सरकार