शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

घरात कोठीतील गव्हाला कीड लागली नाही ना? एकदा बघून घ्या, काय करणार उपाय

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 5, 2023 12:54 IST

मोंढ्यातही येतोय किडलेला गहू; दुकानातील पोत्यातच किडीने केले गव्हाचे पीठ

छत्रपती संभाजीनगर : जाधववाडीतील आडत बाजारात सध्या जुन्या गव्हाची आवक होत असून त्यातील अर्ध्याअधिक गव्हाला कीड लागली आहे. पोते उघडताच गव्हाचे पीठ झाल्याचे दिसते. सध्या परिस्थिती तशी असल्याने तुम्हीही वार्षिक धान्य खरेदी करून कोठीत भरलेल्या गव्हाला कीड तर लागली नाही ना? हे एकदा पाहूणच घ्या.

किती क्विंटल दररोज आवक?जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी दररोज ३०० ते ४०० पोते गहू विक्रीला आणत आहेत. यातील ४५ टक्के गव्हाला कीड लागलेल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदवले आहे.

शेतकऱ्यांना क्विंटलमागे १५०० रुपयांचा फटकामी आज कृउबा समितीत १० क्विंटल गहू विक्रीला आणला. माझ्याकडील गहू दर्जेदार असता तर ३२०० ते ३५०० रुपये क्विंटल भाव मिळाला असता. मात्र गव्हाला कीड लागल्याने २००० ते २१०० रुपये क्विंटल भाव मिळाला. क्विंटलमागे १२०० ते १५०० रुपये नुकसान झाले.- आजीनाथ गोडसे, शेतकरी, चौका (फोटो)

गव्हाला का लागली कीडनवा गहू पूर्वी एप्रिलमध्ये बाजारात येत होता. आता शेतकरी नोव्हेंबरमध्ये रब्बीत गव्हाची पेरणी करतात व फेब्रुवारीत म्हणजे दोन महिने अगोदरच गहू बाजारात विक्रीला आणतात. त्यामुळे दाणे ओलसर असतात, तसेच ते प्लास्टिकच्या गोणीत भरले जातात. ही गोणी गव्हातील ओलसरपणा सुकवत नाही. यामुळे ओलसरपणा तसाच राहून त्याला कीड लागते.- हरीष पवार, आडत व्यापारी

कीड लागलेल्या गव्हाचे काय करावे१) एप्रिल, मे दरम्यान ग्राहक गहू खरेदी करतात. घरी नेल्यावर १५ दिवस तो कडक उन्हात ठेवावा. म्हणजे गव्हातील ओलसरपणा जाईल. नंतरच तो गहू कोठीत भरून ठेवावा.२) गहू भरताना कोठीत लिंबाचा झाडाचा पाला टाकावा, किंवा बाजारात इंजेक्शन मिळते ते कोठीत गव्हात ठेवून द्यावे, त्यामुळे गव्हाला कीड लागत नाही.

आता कीड लागली पुढे काय१) तुम्ही कोठीमध्ये ठेवलेल्या गव्हाला कीड लागली असेल तर तो गहू उन्हात वाळवून घ्यावा.२) उन्हामुळे दाण्याबाहेर कीड निघते व मरते.३) कोठी धुऊन स्वच्छ करावी व २-३ दिवस कडक उन्हात ठेवावी.४) कीड गेल्यावर पुन्हा गहू कोठीत भरून ठेवावा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र