शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जलील काय शहराचा बादशाह आहे का? औरंगाबादचं लवकरच संभाजीनगर होणार, शिरसाटांनी सांगितली टाईमलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 10:01 IST

"इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? असे किती जरी आडवे आले, तरी त्यांना आडवे करण्याची ताकदही आम्ही ठेवणार. संभाजीनगर हे होणारच."

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. एमआयएमचे खासदार  इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा दिला आहे. यावर आता, इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? असे किती जरी आडवे आले, तरी त्यांना आडवे करण्याची ताकदही आम्ही ठेवणार. संभाजीनगर हे होणारच, असे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे, ते पत्रकारांशी बोलत होते.

इम्तियाज जलील काय बादशाह आहे का? -यावेळी, जलील म्हणाले, की औरंगाबादचे संभाजीनगर होऊ देणार नाही. त्यांनी काल बैठकही घेतली, असे विचारले असता शिरसाट म्हणाले, इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? कोण इम्तियाज जलील? इथली जनता महत्वाची आहे आणि हा शिवसेना प्रमुखांचा शब्द आहे. संजय राऊतांसारखे खोटे नाही. संजय राऊत मागे म्हणाले होते, की प्रस्ताव गेला आहे. मग आता प्रस्ताव घ्यायची गरज काय पडली? असा सवालही शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला.

महिनाभरातच दिसून येईल अंमलबजावणी -शिरसाट म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर करणे, हा उद्धव साहेबांनी घेतलेला निर्णय आहे. संभाजीनगर हे होणारच आणि तातडीने होणार. यासाठी केंद्राकडून मान्यता आणावी लागते. केवळ प्रस्ताव घेऊन नसतं होत. याला तातडीने मान्यता आणणार आणि असे किती जरी आडवे आलेना, तरी त्यांना आडवे करण्याची ताकदही आम्ही ठेवणार. संभाजीनगर हे होणारच. आमच्या मनात कसलेही दुमत नाही आणि आता ही घोषणा राहणार नाही. याची अंमलबजावणी तुम्हाला महिनाभरातच दिसून येईल. 

राज्यात 20 जूनला झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 40 आमदारांनी शिवसेनेत बंडाचा बिगूल वाजवला होता. शिंदे यांच्या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे यांचाही सहभाग होता. सुरत, गुवाहाटी, गोवा यानंतर मुंबई आणि थेट सरकार, असा प्रवास करून शिंदे यांनी भाजपाच्या सहाय्याने नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर सोमवारी विश्वासमत जिंकल्यानंतर, आता बंडखोर आमदार आपापल्या मतदार संघात परतत आहेत. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट बुधवारी आपल्या मतदारसंघात परतले आहेत.

शिंदेंच्या नेतृत्त्वातील हा उठाव शिवसेना वाचविण्यासाठी -आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबाद विमानतळावर येताच त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मतदारसंघात कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. भरपावसात आमचे कार्यकर्ते आम्हाला नेण्यासाठी, स्वागतासाठी आल्याचे सांगत, त्यांनी आम्ही आजही शिवसैनिकच आहोत असे म्हटले आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील हा उठाव शिवसेना वाचविण्यासाठी होता, आम्हीच त्यांना हा बंड करायला लावले, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद