शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

छत्रपती संभाजीनगरात महावितरणला उपकेंद्रांसाठी कुणी जागा देतंय का जागा?

By साहेबराव हिवराळे | Updated: June 27, 2024 19:59 IST

दोन उपकेंद्रांसाठी जमिनी मिळाल्या; पण गैरसोयीच्या; एकासाठी जागाच मिळेना

छत्रपती संभाजीनगर : नवीन वीज उपकेंद्रासाठी वाळूज, करोडी, लिंबे जळगाव, साजापूर, तीसगावच्या क्षेत्रालगत असलेल्या ग्रामपंचायतीने जमीन उपलब्ध करून द्यावी, यासाठी महावितरणने बरीच खटपट केली. सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस)साठी साजापूर, तिसगाव ग्रामपंचायतीने जमीन दिली; परंतु ती सोयीची नसल्याने वाळूज औद्योगिक क्षेत्रात उपकेंद्र बनविण्याचा प्रकल्प रखडला आहे.

जमीन द्या, उद्योग येणार असल्याने तुमचाही व्यवसाय वाढेल, त्याचा फायदा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना होईल, असे समुपदेशन महावितरण, महापारेषण करत आहेत. परंतु, याविषयी कुणीही अजून पुढे आलेले नाही. साजापूर परिसरातील जमिनीवरील मुरूम खोदून नेण्यात आल्याने जमीन ओबडधोबड बनली आहे. तिसगाव ग्रामपंचायतीने दिलेली जमीन अगदी दूर कोपऱ्यात गैरसोयीच्या ठिकाणी असल्याने महावितरण नाखूश आहे.

६० एकर शासकीय जमिनीची पाहणीमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० मध्ये जोडवाडी येथे १२ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या ६० एकर शासकीय जमिनीची केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव शशांक मिश्रा यांनी पाहणी केली. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज जवळच्या आडूळ, चित्ते पिंपळगाव व खोडेगाव ३३ केव्ही उपकेंद्रांमार्फत शेतकऱ्यांना दिवसा मिळणार आहे.

ग्रामपंचायतीने पुढे यावे..गट क्रमांकात नवीन उद्योग आले असून, त्यांना त्यांच्या मागणीनुसार महावितरण वीज देण्याच्या तयारीत आहे. परंतु, त्यांच्यासाठी ज्या जमिनी दिल्या आहेत, त्या अत्यंत गैरसोयीच्या असल्याने खूप अडचणी आहेत. वाळूज औद्योगिक क्षेत्र गटक्रमांकातही अखंडित वीज देणार आहेत. जमीन देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढे यावे.- प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता

प्रयत्न सुरूगट क्रमांकातील उद्योजकांच्या क्षमतेची वीज देण्यासाठी उपकेंद्र प्रस्तावित करत आहे. अडचणींचा निपटारा केला जात आहे.- शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, शहर मंडळ

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज