शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये गुन्हे शाखा व एटीएस पथक घेताहेत निर्वासितांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 13:49 IST

प्रतिबंधित देशातील लोकांची घुसखोरी शहरात करून कोणी वास्तव्यास आले आहे काय, हे शोधण्यासाठी गुन्हे शाखा व एटीएस कर्मचारी मिळून ९ पथके शहरात चाचपणीच्या कामाला मंगळवारपासून लागले आहेत. 

ठळक मुद्देदेशातील महत्त्वाच्या शहरांत एक कमांडर आणि त्याच्या तुकडीतील अतिरेकी वास्तव्य करीत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या गुप्तहेर विभागाने दिली आहे़ त्या शहराच्या यादीत औरंगाबादचा उल्लेख असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरिकांच्या शोधासाठी ९ पथकांची स्थापना केली आहे़

औरंगाबाद : प्रतिबंधित देशातील लोकांची घुसखोरी शहरात करून कोणी वास्तव्यास आले आहे काय, हे शोधण्यासाठी गुन्हे शाखा व एटीएस कर्मचारी मिळून ९ पथके शहरात चाचपणीच्या कामाला मंगळवारपासून लागले आहेत. 

देशातील महत्त्वाच्या शहरांत एक कमांडर आणि त्याच्या तुकडीतील अतिरेकी वास्तव्य करीत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या गुप्तहेर विभागाने दिली आहे़ त्या शहराच्या यादीत औरंगाबादचा उल्लेख असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरिकांच्या शोधासाठी ९ पथकांची स्थापना केली आहे़  या पथकात गुन्हे शाखेसह एटीएसचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत़  त्यात ९ एपीआय, नऊ फौजदार आणि ३६ कर्मचारी असे ५४ जणांचा समावेश आहे़ देशातील संवेदनशील ठिकाणांची रेकी (पाहणी) करणारी ‘अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) ही दहशतवादी संघटना देशाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नुकत्याच पुणे, महाड, अंबरनाथमध्ये केलेल्या कारवाईत एटीबीचे सदस्य असणार्‍या पाच बांगलादेशींना अटक केली होती. 

अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणार्‍या एटीबीच्या लक्ष्यस्थानी धार्मिक आणि पर्यटनस्थळांसह लष्कराचे तळही असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे. पकडलेल्या संशयितांकडे औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचा नकाशा आढळून आला आहे़  शिवाय एटीएसने पकडलेल्या संशयितांनी औरंगाबादेत तब्बल एका दिवसात १३ कॉल केल्याचे समोर आले आहे़  ते कॉल करण्यात आलेले नंबर आता बंद आहेत़  त्यामुळे एटीएस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़  त्या आदेशाप्रमाणे बांगलादेशींच्या शोधमोहिमेसाठी एटीएस आणि गुन्हे शाखेचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे़ यासाठी नऊ पथके तैनात करण्यात आली असून, त्या एका पथकात एक अधिकारी, चार कर्मचारी असा समावेश आहे. असा दुजोरा गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी  दिला.