शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

परीक्षेच्या कामात व्यवस्थापन परिषद सदस्याचा हस्तक्षेप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:03 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा भवनमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या नुकत्याच झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकुलगुरूंकडे तक्रार : अभियांत्रिकी उत्तरपत्रिका तपासणीच्या ठिकाणी सावळा गोंधळ

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीलपरीक्षा भवनमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या नुकत्याच झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात येत आहे. याठिकाणी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांनी गुरुवारी अनधिकृतपणे भेट दिल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना परीक्षा भवनतर्फे देण्यात आली, तर उत्तरपत्रिका तपासणीच्या ठिकाणी अनोळखी लोक काम करीत आहेत. त्यांची माहिती घेण्यासाठी मूल्यांकन संचालकांच्या कार्यालयात गेलो असल्याचा दावा डॉ. अंभोरे यांनी केला आहे.विद्यापीठाच्या परीक्षा भवनमध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि व्यवस्थापनशास्त्र या अभ्यासक्रमांच्या परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असल्याचे अनेक वेळा उघडकीस आले आहे. यावर्षी किरकोळ घटना वगळता अभियांत्रिकीच्या परीक्षा विनागोंधळ पार पडल्या आहेत. सध्या परीक्षा भवनमध्ये असलेल्या मूल्यांकन केंद्रात उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम सुरू आहे. या केंद्रात गुरुवारी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अंभोरे यांनी भेट दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकार नसताना डॉ. अंभोरे यांनी मूल्यांकन केंद्राची पाहणी करीत कर्मचाऱ्यांची माहिती विचारली. हा सर्व विभाग गोपनीय आहे. त्याठिकाणी परवानगीशिवाय कोणालाही जाण्यास बंदी आहे. हा नियमांचा भंग असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. याविषयी डॉ. अंभोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी परीक्षा भवनमध्ये एका बैठकीच्या निमित्ताने गेलो होतो. बैठक संपल्यानंतर अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र मूल्यांकन केंद्राच्या संचालकांची भेट घेतली. त्यांच्याकडून मूल्यांकनात काम करणाºयांची नावे घेतली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोपनीय विभागात कार्यरत असलेले कार्मचारी विद्यापीठाच्या परिचयाचेसुद्धा नसल्याचे पाहणीत समोर आले. दहावी पास विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांसारख्या महत्त्वाच्या कामासाठी नेमले असल्याचे दिसून आले. याविषयी कुलगुरूंकडे शुक्रवारी सविस्तर तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कोट,मला याविषयी काहीही बोलायचे नाही. ज्यांनी भेट दिली त्यांनाच विचारा. घटनेची सविस्तर माहिती कुलगुरूंना दिली आहे. त्यांनाच यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.- डॉ. जयश्री सूर्यवंशी, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा