शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

International Women's Day : मुलगा दीड वर्षाचा असताना घेतले जापनीजचे धडे; आता जर्मन मल्टीनॅशनल ग्रुपची आहे ग्लोबल सर्व्हिस हेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 14:25 IST

International Women's Day : औरंगाबादकरांना कायमच अभिमान वाटेल आणि येणाऱ्या पिढीला आदर्श ठरतील, अशा अनेक जणी औरंगाबादने घडविल्या. त्यांच्याच प्रातिनिधिक स्वरूपातल्या या यशस्वी कहाण्या अनेकींसाठी प्रेरणादायी आहेत. जगभरात यशस्वी भरारी घेऊन आपल्या पालकांसह औरंगाबादचे नाव उंचाविणाऱ्या या तारकांना जागतिक महिला दिनानिमित्त मानाचा मुजरा!!

औरंगाबाद : एकीकडे मुलगा अगदीच एक- दीड वर्षाचा असल्याने कामाच्या वेळेवर आलेली बंधने आणि दुसरीकडे कामाला वाहून घेतलेली जपानी माणसे. त्यात पुन्हा भाषेचा अडसर; पण ही कसरत लिलया सांभाळत अपर्णा करिअरचा एकेक टप्पा गाठत गेल्या आणि आज त्या जर्मन मल्टीनॅशनल ग्रुपच्या ग्लोबल सर्व्हिस हेड म्हणून कार्यरत आहेत.

सध्याच्या अपर्णा देशपांडे म्हणजेच पूर्वाश्रमीच्या अपर्णा भालेराव. शारदा मंदिरमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर १९९९ साली जेएनईसी महाविद्यालयातून त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यात नोकरी करत असताना कामानिमित्त अनेकदा परदेशवारी केली; पण खरे आव्हान वाटले ते जपानला गेल्यावर. कारण अपर्णा या बाहेरच्या देशातून त्या कंपनीमध्ये गेलेल्या एकमेव व्यक्ती होत्या. ऑफिसमध्ये कुणालाही इंग्रजी यायचे नाही आणि अपर्णा यांना जापनीज भाषा जमायची नाही; पण जापनीज शिकून अपर्णा यांनी सुरुवातीला जपानी लोकांची मने ओळखून घेतली आणि त्यानंतर कामावरची अढळ श्रद्धा, आपल्या क्षेत्राचे इत्यंभूत ज्ञान, दांडगा अनुभव आणि कामावरची एकाग्रता या गुणांनी जपानी लोकांची मने जिंकून त्यांचा विश्वासही मिळवला. सुरुवातीला केवळ जपानसाठी असणारे अपर्णा यांचे काम नंतर संपूर्ण आशियासाठी विस्तारले गेले. आता तर त्यांच्या कामाची व्याप्ती आणखीनच वाढली असून, त्याच कंपनीसाठी त्या ग्लोबल सर्व्हिस टॉवर हेड म्हणून कार्यरत आहेत.

एन्जॉय बिइंग अ वूमन-बाळाला जन्म देऊन मातृत्व अनुभवणे, हे एक स्त्री म्हणून तुमचे वैशिष्ट्य आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर कामाला काही काळासाठी ब्रेक लागणे, हे अगदी स्वाभाविक आहे; पण यातून बाहेर पडून आपल्याला पुन्हा काम करायचे आहे, हे पक्के ठरवले तर अनेक मार्ग आपोआप सापडतील. त्यामुळे एन्जॉय बिइंग अ वूमन हा संदेश अपर्णा यांनी महिलांना दिला.

औरंगाबादची कचोरी आठवतेय-औरंगाबादला माझी खूप लोकं आहेत. त्यामुळे त्यांची सगळ्यांची आठवण तर मला येतेच; पण औरंगाबादचे विविध खाद्यपदार्थही मी खूप मिस करते. खाद्यपदार्थांमध्ये सगळ्यात जास्त गायत्रीची कचोरी मला अनेकदा आठवते.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनAurangabadऔरंगाबाद