शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मार्ग होणार मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 16:00 IST

‘ब्युरो आॅफ इमिग्रेशन’कडून पाहणी 

ठळक मुद्देसोयीसुविधांचा घेतला आढावादेशांतर्गत सेवेत वाढ होणार

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्युरो आॅफ इमिग्रेशनच्या पथकाने पाहणी केली. पथकाने येथील मनुष्यबळासह सोयीसुविधांचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी इमिग्रेशनची सुविधा महत्त्वपूर्ण ठरते. या पाहणीमुळे ही सुविधा लवकरच विमानतळावर सुरू होऊन आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले. त्यामुळे चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरूहोण्यासाठी पहिले पाऊल पडले होते. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी इमिग्रेशनची सुविधा महत्त्वपूर्ण आहे.  इमिग्रेशन विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची पासपोर्ट आणि व्हिसा तपासणी केली जात असते. 

विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असले तरी येथे इमिग्रेशनची सुविधा नसल्याने त्यासाठी विमानतळ प्राधिकरणासह विविध माध्यमांतून पाठपुरावा केला जात होता. या सुविधेच्या दृष्टीने बुधवारी चिकलठाणा विमानतळावर ब्युरो आॅफ इमिग्रेशनच्या दोन सदस्यीय पथकाने पाहणी केली. यावेळी विमानतळावरील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांची उपस्थिती होती.  साळवे यांनी जानेवारीत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हवाई कनेक्टिव्हिटीची परिस्थिती मांडली. तेव्हा औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर थायलंडच्या राजदूतांना औरंगाबादहून बँकॉकसह आशियाई देशांसाठी विमानसेवा सुरू करून आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रस्ताव देण्यात आला. अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनाही प्राधिकरणातर्फे आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. देशांतर्गत सेवेत वाढ होण्यास आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

‘ब्युरो आॅफ इमिग्रेशन’कडून पाहणी ब्युरो आॅफ इमिग्रेशनकडून पाहणी करण्यात आली आहे. पथकाने विमानतळावरील सोयीसुविधांची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल सादर केला जाईल.  इमिग्रेशनसाठी गॅजेट नोटिफिकेशन काढावे लागते. इमिग्रेशन सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरूहोतील. - डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानCentral Governmentकेंद्र सरकार