शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

अंनिसच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त विवेकवाद्यांची आंतरराष्टय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:22 IST

औरंगाबाद : शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने कार्यरत असलेल्या महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. ही ...

ठळक मुद्देदहा देश सहभागी होणार : अमर्त्य सेन व मलाला यांना निमंत्रण

औरंगाबाद : शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने कार्यरत असलेल्या महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. ही त्रिदशकपूर्ती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून विवेकवाद्यांची आंतरराष्टÑीय परिषद मुंबईत आयोजित केली जाणार आहे. त्यात दहा देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. शिवाय अमर्त्य सेन व मलाला या दिग्गजांनाही परिषदेचे निमंत्रण देण्यात आले आहे.ही माहिती आज येथे एका पत्रपरिषदेत अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. यावेळी शहाजी भोसले, डॉ.श्याम महाजन, डॉ. रश्मी महाजन, कॉ. बाबा आरगडे, अ‍ॅड. रंजना गवांदे, अशोक गवांदे आदींची उपस्थिती होती.यावेळी सांगण्यात आले की, अंनिसच्या संघटित कामाचा लेखाजोखा मांडायचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी विशेषांक निर्मिती व प्रकाशनाची तयारी सुरू आहे. महाराष्टÑाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आमच्या कामाबद्दल त्यांचे निरीक्षण, मूल्यमापनदेखील जाणून घेतले जाईल. मुंबईत ९, १० व ११ आॅगस्ट रोजी विवेकवाद्यांची आंतरराष्टÑीय परिषद व अंनिसचे राज्यस्तरीय अधिवेशन होईल.१५ आॅगस्ट २०१९ ते १ मे २०२० म्हणजे महाराष्टÑ राज्याच्या साठाव्या वर्धापन दिनापर्यंतच्या कालावधीत आम्ही संघटनेतर्फे विविधांगी पद्धतीने व मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कार्याचे योगदान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे अभियान राबविणार आहोत. हे अभियान औरंगाबादपर्यंत पोहोचेल, असेही अविनाश पाटील यांनी जाहीर केले.एका प्रश्नाच्या उत्तरात अविनाश पाटील यांनी सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाल्यापासून उघडपणे चमत्काराचा दावा करणारे बाबा आता थांबले आहेत. भोंदू बाबांच्या विरोधात ५०० एफआयआर दाखल झालेल्या आहेत. १५जणांना शिक्षा झालेल्या आहेत.महाराष्टÑातील व देशातील जनतेने अंधश्रद्धा निर्मूलन ही मानवी विकासातील, प्रगतीतील व आधुनिकीकरणासाठी अत्यावश्यक बाब आहे, हे नक्की स्वीकारलेले आहे, असा दावा पाटील- शहाजी भोसले यांनी यावेळी केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsocial workerसमाजसेवक