शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील आंतरराष्ट्रीय कार्गो हब होणार नोव्हेंबरमध्ये सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:13 IST

बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कार्गो हब सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, सुरक्षा समितीची नुकतीच परवानगी मिळाली आहे.

ठळक मुद्दे याबाबतचा प्रस्ताव भारतीय विमान प्राधिकरणासह केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. आगामी दीड ते दोन महिन्यांत ‘कस्टम’ अधिकाऱ्यांची नेमणूक होऊन नोव्हेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू होणार

औरंगाबाद : बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कार्गो हब सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, सुरक्षा समितीची नुकतीच परवानगी मिळाली आहे. आगामी दीड ते दोन महिन्यांत ‘कस्टम’ अधिकाऱ्यांची नेमणूक होऊन नोव्हेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणातील सूत्रांनी दिली. 

मराठवाड्यातील डाळिंब, मोसंबी, द्राक्षे आदी कृषी उत्पादनांसह बियाणे, स्टील, औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याचा विचार पुढे आला. यासाठी परिसरातील भूसंपादन करण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव भारतीय विमान प्राधिकरणासह केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. सुरक्षा विभागाचा हिरवा कंदिल न मिळाल्याने दोन वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता.

विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांच्यासह काही उद्योजकांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन कार्गो सेवा प्रस्तावाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर केंद्रीय नागरी सुरक्षा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन विमानतळ परिसराची पाहणी केली. विमानतळाच्या जुन्या इमारतीत तूर्तास कार्गो हब सेवा सुरूकरण्यास सुरक्षा विभागाची मंजुरी मिळाली आहे. कस्टम अधिकाऱ्यांची या प्रकल्पाची सेवा सुरूकरण्यास आवश्यकता असल्याने या जागा भरणे आवश्यक आहे. याबाबत कस्टम विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर विभागाकडून आगामी दीड ते दोन महिन्यांत कस्टम अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती होण्याची शक्यता असून, नोव्हेंबरअखेर कार्गो हबमधून सेवा प्रत्यक्षात सुरू होऊ शकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दोन महिन्यात प्रक्रिया सुरु होणार केंद्रीय नागरी सुरक्षा महामंडळाकडून कार्गो हब सुरूकरण्याबाबत मंजुरी मिळाली आहे. नागपूर विभागाकडून कस्टम अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती होताच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. आगामी दोन महिन्यांत ही प्रक्रिया होण्याची अपेक्षा आहे. - डी. जी. साळवे, संचालक, औरंगाबाद विमानतळ प्राधिकरण

टॅग्स :Airportविमानतळbusinessव्यवसायAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ