शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

‘वंचित’शी तलाकच्या मागे एमआयएममधील सुंदोपसुंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 16:24 IST

पक्षात दोन वेगवेगळे गट समोरासमोर आल्यास एकमेकांना आलिंगन देतात. पाठ वळताच पाठीत खंजीर खुपसण्याचे कामही करतात.

ठळक मुद्देएमआयएममधील गटबाजी कारणीभूत  दोन्ही पक्षांतील इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीला शुक्रवारी सायंकाळी एमआयएमने एकतर्फी ‘तलाक’ दिला. एमआयएम पक्षाला विधानसभेच्या आठच जागा देण्यात येत असल्याचे कारण समोर करण्यात आले असले तरी युती तोडण्यासाठी पडद्यामागील अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचे समोर येत आहेत. एमआयएम पक्षातील अंतर्गत गटबाजीच याला प्रमुख कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे.

हैदराबादच्या मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने सर्वप्रथम मराठवाड्यात नांदेडमार्गे औरंगाबाद गाठले. याठिकाणी प्रथम विधानसभा, तर नंतर महापालिकेत पक्षाला घवघवीत यश मिळाले. बघता-बघता पक्षाचा एक खासदारही औरंगाबाद जिल्ह्यात निवडून आला. पक्षाच्या या राजकीय वाटचालीत नेत्यांची कमी आणि मतदारांची भूमिका खूपच महत्त्वाची ठरली. पक्षात दोन वेगवेगळे गट समोरासमोर आल्यास एकमेकांना आलिंगन देतात. पाठ वळताच पाठीत खंजीर खुपसण्याचे कामही करतात. विशेष बाब म्हणजे या दोन्ही गटांनी नगरसेवकही वाटून घेतले आहेत. एका गटाचा नगरसेवक दुसऱ्या गटाच्या नेत्याकडे जात नाही. आदेशही मानत नाही. ही सुंदोपसुंदी अलीकडे बरीच वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षातील एका गटाला तिन्ही मतदारसंघांत एकही उमेदवार निवडून आलेला चालणार नाही. एकही उमेदवार निवडून आल्यास आपली एकाधिकारशाही संपुष्टात येईल, असा धोका आहे. विधानसभेच्या तिकीट वाटपातही पक्षात मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. एमआयएमने एकतर्फी वंचितसोबत युती तोडण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्यात दोन्ही पक्षांतील इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एमआयएमने हैदराबाद येथील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.

युती तोडण्याचे पहिले कारणआगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षातील एका गटाने आता ‘बुद्धि’बळाचा खेळ मांडला आहे. एमआयएम-वंचित बहुजन आघाडीला एका व्यासपीठावर आणण्यासाठी ज्या नेत्याने सेतू तयार केला होता, तो सेतूचा पूल तोडण्याचे काम एका गटाने शुक्रवारी प्रखरतेने केले. कारण भविष्यात हा पूल अधिक मजबूत झाल्यास औरंगाबादेतील एका विधानसभा मतदारसंघात विरोधी गटाच्या नेत्याची वर्णी लागू शकते. वंचित-एमआयएमला वेगळे केल्यास विजयी होण्याचा प्रश्नच नाही.

युती तोडण्याचे दुसरे कारणएमआयएम पक्षातील एका नेत्याने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेच निवडणूक लढवावी यासाठी जोरदार प्रयत्न केले. पश्चिम विधानसभा मतदारसंघ अगोदरच अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मध्य विधानसभेत अनुसूचित जातीचा उमेदवार दिल्यास आपल्याला तिसऱ्या मतदारसंघात अनुसूचित जातीचे मतदान भरघोस मिळेल म्हणून व्यूहरचना आखली. याप्रमाणेच वंचितने मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. आता ज्याने हा चक्रव्यूह आखला होता तोच यात अलगदपणे अडकल्याचे बोलले जात आहे.  

ओवेसींच्या आदेशानंतरच निर्णयपक्षाचे प्रमुख असदोद्दीन ओवेसी यांच्या आदेशावरूनच युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना पत्र दाखवून मंजुरी घेऊनच ते प्रसिद्धीस दिले. मी पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे. आम्हाला ओवेसी यांचेच पत्र पाहिजे, असे कोणीही कोठूनही विचारणार असेल, तर त्याला उत्तर देण्यास मी बांधील नाही. या विषयावर फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर यांनीच बोलावे. या निर्णयामुळे आपण एका दगडात दोन पक्षी मारले का? या प्रश्नावर असे काही नाही. पक्षाच्या हितासाठी हा निर्णय घेतला. कोणाचा फायदा-तोटा हे बघितले नाही.- इम्तियाज जलील, खासदार आणि प्रदेशाध्यक्ष एमआयएम

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAurangabadऔरंगाबाद