शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांनी केली स्वतःच्याच उमेदवारीची घोषणा; नेत्यांच्या भुवया उंचावल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 17:13 IST

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक मागील पाच वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे इच्छुकांची संख्या बरीच वाढली आहे.

- मूजीब देवणीकर

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असताना बहुतांश इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारीची घोषणा सोशल मीडियावर करून टाकली. त्यामुळे संबंधित पक्षातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोणत्याही पक्षात परस्पर उमेदवारीची घोषणा करण्याची पद्धत नाही. अनेक प्रभागांत तर एका जागेसाठी आठ ते दहाजण इच्छुक असल्याची स्थिती आहेत. त्यामुळे स्पर्धेत असलेल्या उमेदवारांमध्ये राजकीय कलह निर्माण होत आहे. काहींनी तर पक्षश्रेष्ठींकडे या कृतीच्या तक्रारीही सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक मागील पाच वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे इच्छुकांची संख्या बरीच वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घ्या, असे आदेश दिले. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आणि महापालिका प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. अगोदर प्रभाग तयार करण्यात असून ११५ नगरसेवक निवडण्यासाठी २९ प्रभाग निश्चित केले. प्रभागाची आरक्षण प्रक्रियाही पार पडली. आता मतदार याद्या अंतिम करण्याचे काम सुरू आहे. आरक्षणाची प्रक्रिया पार पडताच इच्छुक उमेदवार आपापल्या सोयीच्या प्रभागातील एका जागेवर बोट ठेवून आहेत. सोशल मीडियावर इच्छुक उमेदवारांनी तर आपण प्रभागातील कोणत्या जागेवर लढणार हेसुद्धा घोषित करून टाकले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कारण एका जागेसाठी किमान ८ ते १० जण इच्छुक आहेत. काही ठिकाणी तर उमेदवारच भेटत नाहीत. सध्या उमेदवारीसाठी सर्वाधिक स्पर्धा भाजपा, उद्धवसेना आणि एमआयएम पक्षाकडे आहे.

सर्वेक्षणानंतर उमेदवारी ठरेलइच्छुकांनी ‘कमळ’ म्हणून जनतेत जायला हरकत नाही. संबंधित प्रभागात इच्छुकाला नागरिक किती पसंती देतात, हे सर्वेक्षणात ठरेल. त्यानंतर पक्ष कोणाला एकाला उमेदवारी देईल. एवढ्या मोठ्या प्रभागात जनतेसमोर जाण्याचे साधन म्हणजे सोशल मीडिया आहे. त्यामुळे काहींनी प्रचार, प्रसार सुरू केला असेल.- किशोर शितोळे, शहराध्यक्ष, भाजपा.

उमेदवारी पक्ष ठरवेलसोशल मीडियावर कोणी उमेदवारी जाहीर करीत असेल तर ते योग्य नाही. पक्ष ठरवेल कोणाला उमेदवारी द्यायची. हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल.- शेख युसूफ, काँग्रेस

...तर पक्षाकडून कारवाईसोशल मीडियावर स्वत:ची उमेदवारी जाहीर करणे योग्य नाही. अलीकडेच पक्ष स्तरावर आम्ही इच्छुकांना सूचना दिली होती. त्यानंतरही कोणी अशा पद्धतीच्या पोस्ट टाकत असतील तर ते चुकीचे आहे. त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल. उमेदवारी देण्याचा निर्णय कोअर कमिटी घेईल.-शहारेख नक्षबंदी, शहराध्यक्ष, एमआयएम

उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईलमहापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आपली उमेदवारी सोशल मीडियावर जाहीर करीत असले तरी आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांचा चमू येथील प्रत्येक प्रभागात जाऊन सर्वेक्षण करणार आहे. जनतेच्या सुखदु:खात सहभागी होणारा आणि सर्वेत क्रमांक १ वर असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यास पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल. कोणाच्या सांगण्यावरून उमेदवारी मिळणार नाही.- राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना

English
हिंदी सारांश
Web Title : Aspirants' self-nomination for municipal elections raises eyebrows of party leaders.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar: Many aspirants declared candidacy on social media amidst election preparations, surprising party leaders. Internal competition is fierce, with complaints reaching high command. Parties emphasize official nomination processes, warning against premature announcements and promising action against violators.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक