गंगापूर साखर कारखान्यातील गैरव्यवहाराप्रकरणी नुकताच काही संचालक मंडळावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशीची मागणी ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीने केली होती. यासाठी प्रथम विशेष लेखापरीक्षक वर्ग- एक सहकारी संस्था (साखर) औरंगाबाद यांची याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील अंतरिम अहवाल २५ नोव्हेंबरला प्राप्त झाला आहे. कारखान्याचे रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नाही म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८० अन्वये रेकॉर्ड जप्त करून चौकशी अधिकाऱ्यास ते उपलब्ध करून देण्याचे निर्देश गंगापूर तहसीलदारांना दिले आहे.
कारखान्यातील रेकॉर्ड जप्तीचे निर्देश
By | Updated: November 28, 2020 04:16 IST