शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या वर्षभरात उद्यानात सुंदर गुलाबपुष्पांऐवजी कुरूप काटेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:19 IST

गुलाब उद्यानाचे मात्र झाले वाळवंट

ठळक मुद्दे सुंदरता लोपली, गुलाबही सुकले उटीचा दर्जा हे स्वप्नच

औरंगाबाद : केंद्रीय पर्यटन विभागाने राज्याच्या पर्यटन राजधानीत गुलाबपुष्प फुलवून शहराला सुंदरता व मोहकता देण्याचे पाहिलेले स्वप्न कद्रू  व निष्काळजी महापालिकेने उधळून लावले.  उटीच्या धर्तीवर मजनू हिलवर ३ एकरात रोझ गार्डन फुलविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाला. गुलाबांच्या १३ जातींनी हे उद्यान बहरले; पण अवघ्या वर्षभरात उद्यानात सुंदर गुलाबपुष्पांऐवजी कुरूप काटेच दिसत आहेत. 

मागील वर्षी जुलै महिन्यात नागरिकांसाठी उद्यान मोफत करण्यात आले. पहिल्याच दिवशी १,७७४ नागरिकांनी भेट दिली. उद्यानात उनाडांचा धुमाकूळ सुरू झाला. देशी पर्यटकांना उद्यानात पाय ठेवणेही अवघड झाले. अखेर चौथ्या दिवशीच मनपाने उद्यानाला कुलूप ठोकले. त्यानंतर उद्यान सुरू करण्यात आले नाही. ऐतिहासिक औरंगाबादेत दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. पर्यटकांना पाहण्यासाठी शहरात ऐतिहासिक पर्यटनस्थळे बरीच आहेत. सायंकाळी निवांत क्षण घालविण्यासाठी सुंदर रोझ गार्डनही असावे, अशी संकल्पना काही वर्षांपूर्वी पुढे आली. महापालिकेने केंद्रीय पर्यटन विभागाकडे प्रस्ताव पाठविला.

केंद्र शासनाने तब्बल ३ कोटी रुपयांचे अनुदान दिले. या अनुदानातून गुलाबांच्या १४ पाकळ्यांमध्ये एक सुंदर उद्यान विकसित झाले.  उद्यानात सोफिया, ग्लॅडर, समरस्नो, स्कें टिमेंटा, क्रिसमिया, क्लासिक अ‍ॅक्ट, शॉकिंगब्ल्यू, अलिंका, अशा १३ जातींची झाडे लावण्यात आली. मागील ९ महिन्यांत उद्यानाची बरीच वाताहत झाली. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून उच्च प्रतीची गुलाबाची कलमे आणण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने उद्यानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता रोझ गार्डनची रयाच गेली आहे. जिकडेतिकडे मोडतोड झाली. दिवे फोडण्यात आलेत. पाण्याचा हौद कोरडा पडला आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी झाला होता. त्यासाठीही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल केली नाही. 

उद्यानाचा सांभाळ मनपाला करणे अशक्यदारुडे, गोळ्यांची नशा करणारे गर्दुले रोझ गार्डनमध्ये धुडगूस घालत आहेत. खाजगी एजन्सी नियुक्त करून उद्यानाचा सांभाळ केल्यास पर्यटकांना उद्यानात आल्याचा अनुभूती येईल. 

झाडांची कटिंग केलीयथंडी सुरू होताच गुलाबाच्या झाडांची कटिंग केली जाते.  साधारणपणे जानेवारी महिन्यात फुले येण्यास सुरुवात होईल. मार्च महिन्यापर्यंत वेगवेगळ्या झाडांना फुले येत असतात. उद्यानातील गुलाबाची झाडे वाळलेली नाहीत. त्यांना खत आणि पाणी देण्याचे काम सुरू आहे. -विजय पाटील, उद्यान अधीक्षक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाtourismपर्यटन