शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांत खाकीचे स्वप्न, भरतीत शेतकरी पुत्र सॅण्डलवरच धावला; जिद्द पाहून एसपींची जागेवरच मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 14:42 IST

काळजाला भिडणारा संघर्ष! पायात सॅण्डल, मनात पोलीस होण्याची जिद्द; धावताना पाय सोलवटले पण तो थांबला नाही, अखेर साहेबांनीच...

छत्रपती संभाजीनगर: येथील एसआरपीएफ मैदानावर सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत माणुसकी आणि जिद्दीची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आंधारसांगवी येथील शेतकरी पुत्र नितीन नाथू चावरे हा तरुण चक्क पायात साध्या सॅण्डल घालून ५ किलोमीटरच्या धावण्याच्या चाचणीत उतरला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने बूट विकत घेण्याइतपतही पैसे त्याच्याकडे नव्हते. मात्र, त्याची ही जिद्द पाहून एसआरपीएफचे पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी त्याला तात्काळ मदतीचा हात दिला आहे.

सॅण्डलवर धावला अन् तिसरा क्रमांक पटकावलानितीन हा केवळ १२ वी उत्तीर्ण असून गेल्या दोन वर्षांपासून पोलीस होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहे. आई-वडील शेतकरी असल्याने सरावासाठी आवश्यक असणारे महागडे शूज घेणे त्याला शक्य नव्हते. सॅण्डल घालून ५ किलोमीटर धावणे म्हणजे पाय सोलवटणे आणि वेदना सहन करणे होय, मात्र खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून त्याने ही धाव पूर्ण केली. विशेष म्हणजे, अशा कठीण परिस्थितीतही त्याने या धावण्याच्या चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.

एसपी विक्रम साळींनी दाखवली माणुसकीभरती प्रक्रियेचा आढावा घेत असताना एसपी विक्रम साळी यांची नजर सॅण्डल घालून धावणाऱ्या नितीनवर पडली. त्याला बोलावून विचारपूस केली असता, "साहेब, शूज घ्यायला पैसे नव्हते, पण पोलीस व्हायचंय," हे त्याचे उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. स्वतः हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या विक्रम साळी यांनी कष्टाची जाणीव ठेवून तात्काळ नितीनला नवीन बूट मिळवून दिले. केवळ बूटच नव्हे, तर भरतीसाठी येणाऱ्या अशा अनेक गरजू तरुणांसाठी साळी विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जेवण आणि नाश्त्याचीही सोय करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer's son runs in sandals, SP helps him achieve dream.

Web Summary : Impoverished farmer's son, Nitin, ran a 5km police recruitment race in sandals. His determination moved SP Vikram Sali, who provided him with new shoes and support, inspired by Nitin's grit.
टॅग्स :Policeपोलिसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर