शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादसह मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:42 IST

औरंगाबाद रेल्वेस्थानकासमोरील इंजिनची दुरुस्ती करण्यासह रस्ते, ड्रेनेज, परिसर सुशोभीकरण आदींची कामे १५ आॅगस्टपूर्वी करण्याचे आदेश विभागीय व्यवस्थापक त्रिकालयग्य रभा यांनी शनिवारी दिले.

ठळक मुद्देविभागीय व्यवस्थापकांचे आदेश : १५ आॅगस्टपूर्वी इंजिनचे काम करा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्थानकासमोरील इंजिनची दुरुस्ती करण्यासह रस्ते, ड्रेनेज, परिसर सुशोभीकरण आदींची कामे १५ आॅगस्टपूर्वी करण्याचे आदेश विभागीय व्यवस्थापक त्रिकालयग्य रभा यांनी शनिवारी दिले.नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालयग्य रभा, वरिष्ठ डीओएम विक्रमादित्य, वरिष्ठ डीएम नागपुरे, विवेक जैन, डीसीएम नेहा रत्नाकर, सेक्युरिटी कमांडंट पांडे यांचे पथक शनिवारी पहाटे ४ वाजता औरंगाबाद स्थानकात दाखल झाले. विभागीय पथकाचा पाहणी दौरा पूर्वनियोजित असल्याने स्टेशनमास्तरसह विविध विभागांचे अधिकारी स्वागतासाठी सज्ज होते.सर्व विभागांतील अपडेटस् अधिकाऱ्यांनी तयार करून ठेवले होते. पथकाने सकाळी ८ वाजता विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर सकाळी ९ वाजता औरंगाबाद स्थानकातील तिकीट खिडकीसह पसिरातील रस्ते, गटार, इंजिन, बोर्डरूम्स व इतर भागांची पाहणी केली. परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना करून सुशोभिकरण करण्याचे आदेश पथकातील अधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांना दिले. त्यानंतर देखभाल व दुरुस्ती विभागातील अधिकाºयांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या. तो वरिष्ठांकडे दाखल केला असेल, तर त्याच्या स्थितीची माहिती अधिकाºयांकडून पथकाने जाणून घेतली. याचा पाठपुरावा करून सर्व कामे पंधरा आॅगस्टपूर्वी करण्याचे आदेश रभा यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.भूमिगत पुलाची मागणीसकाळी १०.३० वाजता मुकुंदवाडी स्थानकात पथक दाखल झाले. तेथील कामकाजाचा आढावा घेत स्वच्छता, पार्किंग, पथदिवे आदींबाबत काही सूचना अधिकाºयांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी प्लॅटफॉर्म आणि रेल्वे डबा यांच्यात अंतर जास्त असल्याने अपघात वाढले आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी रभा यांच्याकडे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोष सोमाणी यांनी केली, तसेच मुकुंदवाडी स्थानकाच्या समोरील बाजूला लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.या भागात वाहतुकीचा पर्यायी मार्ग नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना रेल्वे रूळ ओलांडूनच दुसºया बाजूला यावे लागते. ते धोकादायक असून, यात एखाद्याचा बळी जाऊ शकतो. यावर उपाययोजना म्हणून भूमिगत पूल तयार करण्याची मागणी रभा यांच्याकडे करण्यात आली. यावर पुलाचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठविल्यास यावर विचार केला जाईल, असे रभा यांनी सांगितले. या पाहणीनंतर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पथक जालना रेल्वेस्थानकाकडे मार्गस्थ झाले.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन